Thursday, April 25, 2024

‘रणवीर तू सुपरस्टार आहेस’, गर्दीत अडकलेल्या मुलासोबत ‘असे’ केल्याबद्दल सर्वत्र होतंय अभिनेत्याचं कौतुक

बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘एनर्जी किंग’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणेजच रणवीर सिंग होय. रणवीरने त्याच्या अस्सल अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. तो त्याच्या मायाळू स्वभावासाठीही ओळखला जातो. याचा प्रत्यय त्याच्या नुकत्याच एका व्हिडिओतून आला. यामध्ये दिसते की, तो जितका चांगला अभिनेता आहे, तितकाच तो एक चांगला व्यक्तीही आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. चला तर रणवीरने नेमकं असं काय केलंय जाणून घेऊया…

झाले असे की, अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) याने एा रडणाऱ्या मुलाला गर्दीतून वाचवले आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांच्या पसंतीस पडला.

रणवीरने केला लहान मुलाचा बचाव
रणवीर सिंग (Ranveer Singh) नुकताच मुंबईतील एका कार्यक्रमात सामील झाला होता. यादरम्यान चाहत्यांची मोठी गर्दीही जमा झाली होती. लोकांच्या गर्दीत एक मुलगा अडकला होता आणि तो रडूही लागला होता. रणवीर जेव्हा परतत होता, तेव्हा त्यावेळी गर्दीत अडकलेल्या रडणाऱ्या मुलाला पाहून त्याला राहवले नाही. रणवीरने त्या मुलाला कडेवर उचलून घेतले आणि त्याला गर्दीतून उचलून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveersingh (@ranveersinghsfanclub)

रणवीरच्या व्हिडिओवर कमेंट
एका निरागस मुलासाठी रणवीरने दाखवलेले हे प्रेम चाहत्यांना खूप आवडत आहे. तसेच, ते रणवीरची प्रशंसाही करत आहेत. मुलाला कडेवर उचलून प्रेम देणारा रणवीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहते रणवीरवर प्रेम व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले की, “आहा हे खूपच स्वीट आहे. रणवीर सिंग तू सुपरस्टार आहेस. लव्ह यू हिरो.” रणवीरच्या या अंदाजावर चाहतेही फिदा झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveersingh (@ranveersinghsfanclub)

रणवीर सिंग दिसणार ‘सर्कस’मध्ये
रणवीर सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या त्याच्या ‘सर्कस’ या आगामी सिनेमाचे प्रमोशन करत आहे. रणवीरचा हा सिनेमा 23 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून चाहते ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा आनंद लुटतील. सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांनाही भावला आहे. आता चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. (actor ranveer singh rescue child from crowd netizens loving him see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काळ्या रंगावरून नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य; रिंकू राजगुरूचं नाव घेत म्हणाला, ‘गोरी नसूनही…’
शॉकिंग! राजपाल यादवने विद्यार्थ्याला दिली धडक, अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल

हे देखील वाचा