Wednesday, January 15, 2025
Home मराठी Prathamesh Parab Wedding : शुभविवाह संपन्न! प्रथमेश परबच्या लग्नाचे खास क्षण

Prathamesh Parab Wedding : शुभविवाह संपन्न! प्रथमेश परबच्या लग्नाचे खास क्षण

“मला वेड लागले प्रेमाचे…” म्हणत घराघरात पोहोचलेला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab ) क्षितीजा घोसाळकरशी(Kshitija Ghosalkar ) लग्नगाठ बांधून (Prathamesh Parab Wedding)आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

Finally……Lockdown love story चे Hearts, forever साठी locked म्हणत प्रथमेशने आपल्या लग्न सोहळ्याचे खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यानंतर त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दोघांना चाहते त्यांच्या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा तसेच गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेश-क्षितिजाचा प्रेमविवाह आहे. इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Prathamesh Parab: ‘तुझी आठवण मात्र कायम…’लग्नापूर्वी दगडुच्या होणाऱ्या बायकोची भावुक पोस्ट

‘मराठी कलाकारांना हिंदी कलाकार घाबरतात’, श्रेयस तळपदेचे विधान चर्चेत

author avatar
tdadmin

हे देखील वाचा