Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन अंधाऱ्या खोलीत टेलिव्हिजन अभिनेत्री टिना दत्ताने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट

अंधाऱ्या खोलीत टेलिव्हिजन अभिनेत्री टिना दत्ताने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट

बॉलिवूडच्या ग्लॅम डॉल आणि बोल्ड अभिनेत्रींना टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्री जोरदार टक्कर देताना दिसतात. टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्री देखील बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच बोल्ड आणि मादक असतात. त्या त्यांच्या मालिकांमध्ये जरी सध्या, सरळ, सोज्ज्वळ भूमिका साकारत असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र या नायिका अतिशय ग्लॅमरस असतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त गाजलेली मालिका म्हणजे ‘उतरन’. या मालिकेतून अभिनेत्री टिना दत्ताने (Tina Datta) चांगलीच लोकप्रियता मिळवली. मालिका बंद होऊन बरेच वर्ष झाले असले तरी टिनाने तिच्या लोकप्रियता आणि प्रसिद्धीमध्ये अजिबात कमी होऊ दिली नाही. मालिकेत तिचा खूपच साधा, सोज्ज्वळ अंदाज दिसला मात्र खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आहे. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

टिनाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे कधी अंधारातले फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. एका अंधाऱ्या खोलीमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घालत तिचे हे नवीन फोटोशूट केले आहे. या शूटसाठी तिने एक बोल्ड ड्रेस घातला असून, यात ती तिचे क्लीवेज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या ड्रेसवर तिने मोठमोठे कानातले घातले असून, त्यावर पोनी टेल आणि सटल मेकअप केला आहे. टिनाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट केले आहेत.

टिना दत्ताचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्सला देखील हे फोटो खूपच आवडत आहे. अनेकांनी या फोटोंवर फायर, हार्ट, स्माईली ईमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी टिना सतत काहीतरी अपडेट पोस्ट करत फॅन्सच्या संपर्कात राहते. फॅन्सला देखील टिनाच्या पोस्टची उत्सुकता असते. अनेकदा ते तिला कमेंट्स करत काहीतरी नवीन पोस्ट शेअर करण्यासाठी सांगताना दिसतात.

हेही वाचा

हे देखील वाचा