Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड मुनीमपासून ते ‘अंबानी’ बनण्यापर्यंत, ‘असा’ आहे अभिनेत्री टीनाचा प्रवास

मुनीमपासून ते ‘अंबानी’ बनण्यापर्यंत, ‘असा’ आहे अभिनेत्री टीनाचा प्रवास

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि देशातील श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची देखील नेहमी चर्चा होत असते. सध्या रिलायन्स उद्योग समूहाची मालकिण असलेल्या टीना मुनीम (Tina Munim) कधी काळी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. शुक्रवारी अभिनेत्री त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल.

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून टीना मुनीमचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. टीना यांचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांंना सिनेसृष्टीत जाण्याची इच्छा होती. पहिल्यापासून त्यांना अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीपासून त्यांनी ‘देस परदेस’ चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. टीनाने ‘लूटमार’, ‘मनपसंद’, ‘रॉकी’, ‘सौतन और कर्ज’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

अभिनय क्षेत्रात लोकप्रिय ठरलेल्या टीना यांना या क्षेत्रात यायचे नव्हते. त्यांनी १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रिन्सेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये त्यांना मिस फोटो जेनिक आणि मिस बिकिनी अवॉर्ड मिळाला होता. यावेळी याच कार्यक्रमात देव आनंद (Dev Anand) यांची नजर टीना मुनीमवर पडली. त्यांना ‘परदेस’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. सुरुवातीला टीनाने यासाठी नकार दिला होता. कारण फॅशन डिझायनर होण्यासाठी त्यांना स्पेनला जायचे होते.

गुजराती घरात जन्मलेल्या टीनाचे खरे नाव निवृत्ती मुनीम असे आहे. टीना आपल्या चित्रपटांप्रमाणे प्रेम प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आल्या होत्या. त्याकाळात सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबत त्या दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होत्या. विवाहित असूनही राजेश खन्ना टीनाच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. टीनासुद्धा विवाहित राजेश खन्ना यांच्या प्रेमात बुडाल्या होत्या. इतकेच नव्हे, तर टीना यांनी राजेश खन्ना यांना  पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी सांगितले होते. मात्र राकेश खन्ना आणि डिंपल यांचा कधीही घटस्फोट होऊ शकला नाही.

राजेश खन्ना आणि टीनाने ‘फिफ्टी फिफ्टी’, ‘सुराग’, ‘अलग अलग’, ‘अधिकार’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले. १९८७ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. शेवटी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

साल १९८६मध्ये टीना मुनीम पहिल्यांदाच उद्योजक अनिल अंबानी यांना भेटल्या. रिपोर्टनुसार, अनिल अंबानी यांनी एका लग्नात टीनाला पहिल्यांदा पाहिले आणि इथूनच त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. १९९१मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा-

हे देखील वाचा