टीएमसी सांसद असलेली नुसरत जहाँ ही अतिशय चर्चत व्यक्तिमत्व. जेव्हा ती पहिल्यांदा सांसद झाली, तेव्हापासूनच ती कमी वयाची सांसद असल्याने आणि तिच्या सौंदर्यामुळे माध्यमांमध्ये यायला लागला होती. मात्र तिला खरी ओळख आणि खरी प्रसिद्धी तेव्हा मिळाली, जेव्हा तिने निखिल जैनसोबत २०१९ मध्ये लग्न केले.
मात्र आता नुसरत प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या येत आहे. एका बंगाली चॅनेलच्या माहिती नुसार नुसरत सहा महिन्यांची प्रेग्नेंट असून, ती मागील सहा महिन्यांपासून तिच्या पती निखिल जैन याच्यापासून वेगळी राहत आहे. चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार निखिल जैनने सांगितले की, “आमचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. नुसरत आणि माझ्यामध्ये मागील काही महिन्यांपासून कोणताच संपर्क नाही.” त्यामुळे हे बाळही त्याचे नसल्याचा दावा त्याने केला आहे.
नुसरतचे सौंदर्य आणि तिचे लग्न या दोन्ही गोष्टींमुळे नुसरत बरीच लाइमलाईट्मधे राहिली आहे. असे नाही की तिला आधी कोणी ओळख नव्हते. अभिनेत्री असलेल्या नुसरतला तिच्या लग्नामुळे संपूर्ण देशात ओळख मिळाली. नुसरतची लोकप्रियता बघता ममता बॅनर्जी यांनी तिला निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार तिने निवडणूक तर लढवली आणि तब्बल साडे तीन लाख मतांनी ती जिंकली देखील.
२०१९ मध्ये तिने कोलकात्याच्या उद्योगपती असणाऱ्या निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. हे लग्न प्रचंड गाजले. याचे कारण म्हणजे मुसलमान असूनही तिने घातलेले मंगळसूत्र आणि लावलेला सिंदूर काही कट्टरपंथीयांना काही रुचला नाही आणि त्यांनी नुसरतच्या विरोधात फतवे काढले.
नुसरतने लग्नानंतर हिंदी नववधूच्या रूपात संसदेत प्रवेश करत खासदारकीची शपथ घेतली होती. यामुळे मोठा वादंग देखील उठला होता. नुसरतने निवडणुकीवेळी सांगितलेल्या माहितीनुसार, ती १२ वी पास असून तिच्याकडे ३ कोटींची संपत्ती आहे. अतिशय यशस्वी अभिनय आणि राजकीय कारकीर्द असूनही ती सतत वादात अडकलेली राहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…