Saturday, December 7, 2024
Home टेलिव्हिजन हातात हत्यारं घेऊन तब्बल 25 गुंडांचा दिलीप जोशी यांचा घराला घेराव, मुंबई पोलीस अलर्ट

हातात हत्यारं घेऊन तब्बल 25 गुंडांचा दिलीप जोशी यांचा घराला घेराव, मुंबई पोलीस अलर्ट

तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारे दिलीप जोशी हे जेठालाल ही भूमिका साकारतात. मालिकेतून सगळ्यांना हसवणाऱ्या दिलीप जोशींच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या नंतर आता दिलीप जोशी यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. दिलीप जोशी यांच्या घराच्या आजूबाजूला २५ गुंड फिरताना दिसत आहे. एका माहितीनुसार त्या गुंडांच्या हातात अनेक भयानक शस्त्र आणि बॉम्ब देखील आहेत. ही बातमी कोणत्या अनोळखी व्यक्तीने नागपूर पोलीस कंट्रोल रूमला सांगितली असून, या बातमीमुळे पोलीस कामाला लागले आहेत. दिलीप जोशी यांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर पोलीस कंट्रोल रूमला १ फेब्रुवारी रोजी एक फोन आला होता ज्यात दावा केला गेला होता की २५ लोकं हत्यारं घेऊन शिवाजी पार्कमधील दिलीप जोशी यांच्या घराच्या बाहेर उभी आहेत. हा तोच फोन होता ज्याने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावले असल्याची माहिती दिली होती. फोन करणाऱ्याने हे देखील सांगितले की, त्या २५ लोकांनी काही लोकांशी बोलणे देखील केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

त्यानंतर नागपूर कंट्रोल रूपाने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अलर्ट देखील केले आणि चौकशी करायला लावली. फोन करणाऱ्याने हा देखील दावा केला की त्याने काही लोकांना बोलताना ऐकले हे २५ लोकं काही गोष्टी करण्यासाठी मुंबईला येणार आहेत. आतापर्यंत हे समजले आहे की, हा नंबर एका अज्ञात व्यक्तीचा असून, तो दिल्लीचा आहे, आणि सिमकार्ड कंपनीमध्ये काम करतो.

याआधी देखील एका अनोळखी व्यक्तीने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची घरं बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अंबानी कुटुंबाला Z+ सुरक्षा दिली होती. तत्पूर्वी दिलीप जोशी हे तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहे. ही मालिका मागील अनेक वर्षांपासून सुरु असून, मालिकेने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. दिलीप जोशी यांना देखील या मालिकेने एक वेगळी ओळख मिळवून दिली.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा