Friday, July 5, 2024

अंगावर काटा आणणारा ‘पुष्पा 2’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला, अवघ्या दाेनच तासात 21लाख हिट्स

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा: द राइज‘ ने बॉक्स ऑफिसवर कमालीची कामगिरी केली. प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला. पहिल्या भागानंतर ‘पुष्पा’ची टीम लवकरच दुसऱ्या भागातही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 08 एप्रिल हा अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे आणि त्याच्या एक दिवस आधी निर्मात्यांनी ‘पुष्पा: द रुल’ चा टीझर रिलीज केला.

डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ला दक्षिण भारतीय प्रेक्षकांनी तसेच हिंदी पट्ट्यातून खूप पसंती दिली. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन एका निर्भय व्यक्तिरेखेत दिसला होता. तो लाल चंदनाची तस्करी करतो आणि यातून तो हळूहळू उंची गाठतो. ‘पुष्पा’ची कथा इथेच संपत नाही, असे या चित्रपटाच्या शेवटी सांगण्यात आले. पहिला भाग पुष्पाच्या उदयाचे वर्णन करतो, तर दुसऱ्या भागात त्याच्या उदयाची कथा दाखवली जाईल. अनेक दिवसांपासून ‘पुष्पा 2’ची सोशल मीडियावर क्रेझ होती.

अशात चाहत्यांची प्रतीक्षा संपवत निर्मात्यांनी अखेर टीझर रिलीज केला आहे. 3.15 सेकंदच्या या व्हिडिओमध्ये पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही. असा रंजक असलेला टिझर चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. चाहते या व्हिडिओ लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

या चित्रपटाच्या पहिल्या भागाने म्हणजेच ‘पुष्पा: द राइज’ने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्नानेही मुख्य भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागातही ती अल्लू अर्जुनची लेडी लव्ह दिसणार आहे.

त्याचबरोबर, यावेळी अजय देवगण किंवा तिन्ही खानांपैकी एक (सलमान, शाहरुख आणि आमिर) या संपूर्ण चित्रपटाचा भाग असेल अशीही चर्चा आहे.(tollywood actor allu arjun film pushpa 2 the rule teaser released in hindi and other languages )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

हे देखील वाचा