साऊथ इंडस्ट्रीतील दमदार अभिनेता धनुष काही दिवसांपूर्वी विमानतळावर वाढलेली दाढी आणि लांब केसांसह दिसला होता. अनेक दिवसांपासून अभिनेत्याचा हा लूक चर्चेत होता. त्याचवेळी धनुषचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फाेटाेमध्ये धनुषचा पुन्हा एकदा नवा लूक पाहायला मिळत आहे, जे पाहून त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
खरं तर, नुकताच धनुष (dhanush) आपल्या मुलांसोबत तिरुपती मंदिरात पोहोचला होता, ज्यादरम्यान त्याने मुंडण केल. दरम्यान, आता अभिनेत्याचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फाेटाेमध्ये अभिनेत्याने निळा शर्ट परिधान केलेला आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेला दिसत आहे. मंडळी, अभिनेता धनुष याने आपले लांब केस पूर्णपणे कापले आहेत आणि फक्त मिशा ठेवल्या आहेत.
अभिनेत्यासोबत त्याची मुले आणि आई-वडील कस्तुरी राजा आणि विजयालक्ष्मी दोघेही दिसत आहे. धनुषचे हे फोटो पाहून काहींना कुठे आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काही चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, हा त्याचा आगामी चित्रपट D50चा नवीन लूक आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Actor #Dhanush's new look.
The star has tonsured his head today in Tirupati temple. pic.twitter.com/uKt0SMFNOY
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) July 3, 2023
धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ हा चित्रपट 1930च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं म्हटलं जातं, ज्याचा फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण मतेश्वरन यांनी केले आहे, ज्यामध्ये धनुष व्यतिरिक्त कन्नड अभिनेता शिवा राजकुमार आणि तमिळ स्टार सुदीप किशन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. माध्यमातील वृत्तांनुसार, हा चित्रपट यावर्षी रिलीजसाठी सज्ज आहे. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.(tollywood actor dhanush tirupati mandir with family actor new look photos viral on social media )
अधिक वाचा-
रितेश पांडेचा ‘चांद बेवफा निकल गया’ प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीच्या आठवणीने ढसाढसा रडला अभिनेता
‘नातेवाईकच मुलींसोबत बला’त्कारासारखे घृणास्पद…’, हे काय बाेलून गेली उर्फी जावेद? व्हिडिओ एकदा पाहाच