Thursday, June 13, 2024

रितेश पांडेचा ‘चांद बेवफा निकल गया’ प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीच्या आठवणीने ढसाढसा रडला अभिनेता

भोजपुरी स्टार रितेश पांडेने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अशात आता तो पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे ‘चांद बेवफा निकल गया’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. गाण्याची थीम प्रेमातील बेवफाईवर आहे, ज्यामध्ये रितेश पांडेने जबरदस्त एक्सप्रेशन्स दिले आहेत.

या गाण्यात रितेश पांडे (ritesh pandey) ढसाढसा रडताना दिसत आहे. म्हणजे रितेश पांडेला त्याच्या प्रेयसीने फसवलं होतं, ज्याचा उल्लेख त्याने आपल्या गाण्यातून रडताना केला आहे. रितेश पांडेची गाण्यातली व्यथा, चाल आणि संगीत यातून स्पष्टपणे दिसून येते. सारेगामा हम भोजपुरी या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणे रिलीज करण्यात आले असून काही वेळातच ते व्हायरल झाले आहे.

‘चांद बेवफा निकल गया’ या गाण्याबाबत रितेश पांडे म्हणाला, “साधारणतः प्रेमात निष्ठा आणि बेवफाई पाहायला मिळते, ज्यामध्ये निष्ठेपेक्षा बेवफाईच्याच जास्त चर्चा होतात.” जो बेवफाईचा बळी असतो, त्याची काय अवस्था होते. जेव्हा तुम्हाला ओळखणारा तुमचं प्रेम तुमच्यापासून हिरावून घेतो तेव्हा दुःख जास्त असतं.

तो पुढे म्हणाला, “प्रेक्षकांना हे या गाण्यात पाहायला मिळेल. लहानपणापासून आजपर्यंत अनेक दु:खाची गाणी ऐकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अनेक गाणीही गायली आहेत, पण हे गाणं माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ करताना मी मनातून रडत होतो. गाण्याचा प्रत्येक शब्द खूप खास आहे. मी सर्वांनी हे गाणे पाहावे आणि व्हायरल करावे असे आवाहन करेन.”

व्हिडिओमध्ये श्वेता मेहरा आणि रितेश पांडेची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मंजी मीता यांनी या गाण्याला तिचा आवाज दिला आहे, तर संगीत आशिष वर्मा यांनी दिले आहे.(bhojpuri actor ritesh pandey song chand bewafa nikal gaya released)

हे देखील वाचा