Sunday, September 8, 2024
Home टॉलीवूड ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी दिला बकऱ्यांचा बळी, नऊ आरोपींना अटक

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी दिला बकऱ्यांचा बळी, नऊ आरोपींना अटक

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि त्याच्या चित्रपटांची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. अशात नुकताच या अभिनेत्याने त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान त्याच्या चाहत्यांनीही हा खास सोहळा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. मात्र, अभिनेत्याचा यंदाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या नऊ चाहत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. खरं तर, ज्युनियर एनटीआरच्या नऊ चाहत्यांना यज्ञकार्यात सहभागी असल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे.

खरे तर, ज्युनियर एनटीआर (JR NTR) याने 20 मे रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त, अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून, चाहत्यांनी उत्साहात दोन बकऱ्या मारल्या आणि त्यांचे रक्त जूनियर एनटीआरच्या फ्लेक्सी बॅनरवर लावले. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी चाहत्यांना अटक केली आहे. पी शिवा नागा राजू, के साई, जी साई, डी नागा भूषणम, व्ही साई, पी नागेश्वर राव, वाय धरणी, पी शिवा आणि बी अनिल कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, सिरी कृष्णा आणि सिरी वेंकट यांच्यासोबत ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिव नागा राजू आणि त्याचे मित्र थिएटरमध्ये पोहोचले. अशात सिनेमागृहात पाेहचल्यानंतर त्यांनी बकऱ्या मारुन ज्युनियर एनटीआरच्या बॅनरवर त्यांचे रक्त लावले आणि वापरलेल्या धारदार शस्त्रांसह बकऱ्याचे मृतदेह घेऊन गेले. परिणामी विजयवाडा येथील रॉबर्सनपेट पोलिसांनी आरोपींना अटक केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

ज्युनियर एनटीआरच्या 40व्या वाढदिवसानिमित्त आणखी एक घटना उघडकीस आली आहे. खरे तर, अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा 20 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सिम्हाद्री’ पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. अशात चित्रपटगृहात अभिनेत्याच्या चाहत्यांनी माेठी गर्दी केली होती. मात्र, चित्रपट पाहताना अभिनेत्याच्या चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि चित्रपटगृहात फटाके फोडले गेले. परिणामी फटाक्यांमुळे सिनेमा हॉलला आग लागली.(Tollywood actor jr ntr fans arrested for allegedly sacrificed two goats spilled their blood on actor banner on his birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“बारामतीत काकांनी हात बाजूला केला तर…” राज ठाकरेंनी लगावला अवधूत गुप्तेच्या शोमध्ये अजित पवारांना टोला

ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा