Monday, July 1, 2024

महेशच्या लेकीनं मराठीतून दिल्या शुभेच्छा, आई नम्रताने शेअर केला खास व्हिडिओ

दाक्षिणात्य लाेकप्रिय अभिनेता महेश बाबू काेणत्याना काेणत्या कारनामुळे सतत चर्चेत असते. अनेकदा महेश त्याच्या कामासह कुटुंबाचे फाेटाेही साेशल मीडियावर शेअर करताे. अशातच अभिनेत्याची पत्नी नम्रता शिराेडकर हिने लेक सिताराचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सिताराचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

आज म्हणजेच रविवारी (दि. 15 जानेवारी)ला देशभरात मकर संक्रांत माेठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशात मराठी कुटुंबातून आलेली नम्रता शिराेडकर ही मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या लेकीचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत तिच्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

नम्रता शिराेडकरची लेक सितारा हिने चाहत्यांना मराठीतून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सितारा, “मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.” असे बाेलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या लेकीनं पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगताे की, नम्रताने महेश बाबूशी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. मात्र, ती साेशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नम्रता शिराेडकर हिच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘पुकार’, ‘जब प्यार किससे हाेता है’, ‘हिराे हिंदुस्थानी’, ‘हत्यार’, ‘हॅलाे इंडिया’ या सारखे दमदार चित्रपट सिनेसृष्टीला दिले. अभिनेत्री दाक्षिणात्य संस्कृती बरोबर आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचाही खूप आदर करते आणि सण साजरे करते. तिचे दाेन्ही मुलं दाक्षिणात्ता भाषांसाेबतच मराठी भाषाही उत्तमप्रकारे बाेलताना दिसतात. (tollywood actor mahesh babu daughter sitara gave makar sankranti wishes in marathi namrata shirodkar share video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कांतारा’ फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट

नादचखुळा! कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला ‘वेड’

हे देखील वाचा