महेश बाबूची पत्नी नम्रताने दिवंगत सासूबाईंसाठी लिहिली भावूक पोस्ट; म्हणाली, ‘तुम्ही दिलेलं प्रेम…’

0
104
Namrata-Shirodkar
Photo Courtesy: Instagram/namratashirodkar

साऊथचे सुपरस्टार महेश बाबू याची आई इंदिरा देवी यांनी मंगळवारी (दि. 27 सप्टेंबर) या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर काेसळला आहे. टॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटींनी इंदिरा देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून कुटुंबाचे सांत्वन केले आहे. महेश बाबू हा त्याच्या आईच्या खूप जवळ हाेता. आता त्यांच्या मृत्यूनंतर महेश बाबूकडे त्याच्या आईसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींशिवाय काहीच नाही. त्याने आपल्या आईचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करून आईच्या निधनाचे दुःख व्यक्त केले. महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर हिनेही सासूंचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याने काही न बाेलता आई प्रती प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने दिवंगत इंदिरा देवी  (Indira Devi) यांचा ब्लॅक अँड व्हाईट फाेटाे शेअर करत हार्ट इमाेजीचाही समावेश केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

अभिनेत्री नम्रता शिराेडकर (Namrata Shirodkar) हिने देखील आपल्या सासूची आठवण काढत हृदयाला भिडणारी पाेस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, “आम्हाला तुमची खूप आठवण येईल… तुम्ही आमच्या आठवणींमध्ये कायम राहणार आणि तुम्ही मला जे प्रेम दिलं आहे, ते प्रेम मी तुमच्या मुलांना आणि नातवंडांना देईन… आई आम्ही सगळे तुमच्यावर खूप प्रेम करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

आजीच्या मृत्यूने महेश बाबूची मुलगी सितारा हिला देखील खूप माेठा धक्का बसला आहे. सितारा इंदिरा देवींच्या फार जवळची हाेती. आजीच्या निधनानंतर सिताराने इंस्टाग्रामवर फाेटाे शेअर करत लिहिले, “आजी मला तुमची खूप आठवण येईल.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, इंदिरा देवी यांना वयाशी संबंधित आजार होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘केसरिया’ गाण्यावरून अयान मुखर्जीवर भडकलेला करण जोहर, पण काय होते कारण?
आता घाबरायचं कामच नाही! 23 चित्रपट निर्मात्यांचा नेपोटिझमवर हल्ला; नवीन कलाकारांसाठी बनवला प्लॅटफॉर्म

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here