Sunday, October 6, 2024
Home साऊथ सिनेमा महेश बाबुचा सावत्र भाऊ करतोय चौथे लग्न; तिसऱ्या पत्नीने दिली जिवे मारण्याची धमकी

महेश बाबुचा सावत्र भाऊ करतोय चौथे लग्न; तिसऱ्या पत्नीने दिली जिवे मारण्याची धमकी

महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश याने तिसरी पत्नी रम्या रघुपतीवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्याने अलीकडेच अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्नाची घोषणा केली असून त्यांचे हे चौथे लग्न असेल. आता त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, त्याची तिसरी पत्नी रम्या रघुपती त्याला सतत धमक्या देत आहे.

नरेश बाबू  (naresh babu )यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले असून न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. मीडियाशी बोलताना नरेश म्हणाला, ‘राम्या रघुपतीने मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती माझ्याकडून 10 कोटी रुपयांची मागणी करत आहे. 2022 मध्ये काही सुपारी किलर टोळीने त्यांची रेकीही केली होती, असेही त्यांनी सांगितले. तो म्हणतो, ‘माझ्या जीवाला धोका असल्याने मला सुरक्षा द्यावी, अशी विनंती मी न्यायालयाकडे केली आहे. माझा फोन टॅप केला जात आहे. मी सायबर तक्रारही केली आहे.

रम्या रघुपती सांगतात की, ‘नरेश बाबूचे लग्नादरम्यान अनेक अफेअर होते आणि जेव्हाही ती त्यांना याबद्दल विचारत असे तेव्हा तो तिच्या पायाला हात लावून माफी मागायचा. आपल्या सासूलाही याची माहिती होती आणि त्यांनी नरेशला मालमत्तेतून बेदखल करण्याचा इशाराही अनेकवेळा दिला होता’, असेही त्यांननी सांगितले. नरेश बाबूने अलीकडेच अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्नाची घोषणा केली आहे. रम्याने असेही सांगितले की, ‘तिला घटस्फोट घ्यायचा नसल्यामुळे ती हे लग्न कधीही होऊ देणार नाही.’

यापूर्वी नरेश आणि पवित्र लोकेश यांनी एका रोमँटिक व्हिडिओद्वारे त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आणि लग्न करण्याबाबत चर्चा केली.(tollywood actor mahesh    step brother naresh accuses third wife of threatening to kill him as actor is getting married for the fourth time to pavithra lokesh)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखच्या पठाणला छेद पाडत ‘वेड’ चित्रपटानं केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, पोस्ट शेअर करत रितेश म्हणाला…

‘लोकांना शाहरुखचा…’, पठाण वादावर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा