भल्लाल देव म्हणजेच ‘बाहुबली‘ चित्रपटाचा अभिनेता राणा दग्गुबती याच्याबद्दल एक माेठी बातमी समाेर येत आहे. अभिनेता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, अभिनेता आणि त्याचे वडील सुरेश बाबू यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण मालमत्तेच्या वादाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणी राणा डग्गुबती याला नोटीसही बजावल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमातील वृत्तांनुसार, 2014मध्ये राणा दग्गुबती (rana daggubati) आणि सुरेश बाबू यांनी हैदराबादच्या फिल्म सिटीजवळील त्यांची जमीन प्रमोद कुमार नावाच्या एका व्यावसायिकाला हॉटेलसाठी लीजवर दिली होती. मात्र, दग्गुबतीचे वडील सुरेश बाबू यांनी त्यांची जमीन विकण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सुरेश बाबूने प्रमोद कुमार यांना जमीन खाली करण्यासाठी 5 कोटी रुपये दिले. ज्यानंतर प्रमोदने जमीन खाली करण्यास नकार दिल्याने त्याच्यावर जमीन खाली न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अशात आता प्रमोदनेही कोर्टात धाव घेतली आहे.
वृत्तानुसार, प्रमोद कुमार यांनी पोलिस तक्रारीत सांगितले आहे की, त्यांना कोणत्याही प्रकारचे 5 कोटी रुपये दिले गेले नाहीत. यासोबतच राणा डग्गुबती आणि सुरेश बाबू यांनी आपली जमीन खाली करण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्या व्यक्तीने केला आहे. अशा परिस्थितीत प्रमोदने राणा डग्गुबती आणि सुरेश बाबू यांच्यावर जमीन हडपल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
View this post on Instagram
राणा डग्गुबाडी दक्षिणेतील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, येत्या काळात राणा डग्गुबती ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या ‘राणा नायडू’ या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज आहे, ज्याचा टीझर आधीच रिलीज झाला आहे.(tollywood actor rana daggubati in legal trouble for property issues know details)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम ओमला भेटली खऱ्या आयुष्यात स्वीटू, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
ओ मेरी हंसीनी…! हुमा कुरेशीच्या साडीवर कातीलाना अंदाज, पाहाच व्हायरल फोटो