Monday, July 15, 2024

बाहुबली सिनेमातील प्रभासचा रोल मिळाला होता ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला, भूमिका करण्यास नकार देत…

सलमान खानपासून तर सैफ अली खानपर्यंत, विविध कलाकारांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सर्वच अभिनेते अथवा अभिनेत्रींनी अनेक सुपरहिट चित्रपट हिंदी अथवा इतर सिनेसृष्टीला दिले आहेत. मात्र, आज आपण या लेखात असे अभिनेते आणि अभिनेत्रींची नावे पाहणार आहोत ज्यांना ऑफर झालेले चित्रपट त्यांनी नाकरल्यानंतर त्यात पुढे दुसऱ्या कलाकाराने अभिनय केला आणि ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः हिट झाले आहेत.

‘चक दे इंडिया’पासून ते ‘बाजीराव मस्तानी’पर्यंत असे अनेक सिनेमे आहेत जे कलाकारांनी काही कारणांनी नाकारले आणि नंतर ते सिनेमे दुसऱ्याच्या झोळीत पडून सुपरहिट झाले. पाहूया असेच काही कलाकार आणि त्यांना ऑफर झालेले सिनेमे.

ऋतिक रोशन – बाहुबली

सन 2015 साली आलेल्या ह्या चित्रपटाने तर इतिहास रचला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी भरपूर कमाई करत अनेक रेकॉर्ड तोडले आणि नवीन रेकॉर्ड सेट केले. पण खूप लोकांनी माहित नसेल की, ह्या चित्रपटासाठी पहिली पसंती ऋतिक रोशन होता. त्याने काही वैयक्तिक कारणांनी हा सिनेमा नाकारला आणि हा रोल प्रभासला मिळाला. प्रभासला या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळून दिली. ऋतिक मात्र, त्याच्या तेव्हाच्या निर्णयावर आज कदाचित पश्चताप करत असेल.

सैफ अली खान – दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

आजपर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वात हिट सिनेमा म्हणून ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ची ओळख आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि काजोल ने लीड रोल साकारला होता. मात्र, शाहरुखच्या आधी ही भूमिका सैफ अली खानला ऑफर झाली होती. त्यावेळी त्याने या चित्रपटाला नकार दिला आणि हा रोल शाहरुखला मिळाला.

अभिषेक बच्चन – कभी खुशी कभी गम

मल्टीस्टारर ब्लॉकबस्टर हिट चित्रपट म्हणून कभी खुशी कभी गम ओळखला जातो. ऋतिक रोशनच्या भूमिकेसाठी अमिताभ आणि जया यांना अभिषेक पाहिजे होता. मात्र करणने अगोदरच ऋतिक रोशनची निवड केली. अभिषेकच्या या सिनेमात एक सीन होता पण काही कारणांमुळे तो काढून टाकण्यात आला.

ऋतिक रोशन और अभिषेक बच्चन – दिल चाहता है

‘दिल चाहता हैं’ सिनेमात आमिरच्या भूमिकेसाठी सर्वात आधी ऋतिक रोशनला विचारणा करण्यात आली होती. मात्र तो इतर सिनेमात व्यस्त असल्याने त्याने या सिनेमाला नकार दिला. मग फरहान अख्तरने अभिषेक बच्चनला विचारले त्याने देखील या रोलला नकार दिला. तेव्हा या सिनेमात सिद्धार्थ ही भूमिका आमिरने साकारली आणि ती प्रचंड हिट झाली.

शाहरुख खान – मुन्नाभाई एमबीबीएस

आज आपण मुन्नाभाई सिरीजच्या सिनेमात संजय दत्त शिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही. मात्र, तुम्हाला माहित आहे का ही भूमिका संजय आधी शाहरुखला ऑफर झाली होती. शाहरुखने ही भूमिका करायला नकार दिल्यानंतर संजयला विचारणा झाली. त्याने ही भूमिका साकारत इतिहास रचला.

ट्विंकल खन्ना – कुछ कुछ होता है

कॉफी विद करणमध्ये ट्विंकल खन्नाने सांगितले होते की, कुछ कुछ होता है मधली टीना ही भूमिका ट्विंकलला समोर ठेऊनच लिहली गेली होती. मात्र, नरेशनच्या वेळेला ही भूमिका ट्विंकलला आवडली नाही आणि तिने नकार दिला. मग या सिनेमात राणीची वर्णी लागली, आणि सिनेमा हिट झाला.

करीना कपूर आणि सलमान खान – बाजीराव मस्तानी

दीपिका आणि रणवीर सिंग यांचा बाजीराव मस्तानी हा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट झाला होता. मात्र सर्वात आधी भन्साळी यांना या सिनेमात सलमान आणि ऐश्वर्या यांना घ्यायचे होते पण त्याचे तेव्हाच ब्रेकअप झाले, मग त्यांनी सलमान आणि करीनाला घ्यायचे ठरवले. त्याच्यासोबत फोटोशूट देखील झाले होते पण काय झाले माहित नाही आणि या दोघांनी नकार दिला मग त्यात दीपिका आणि रणवीर यांना घेऊन सिनेमा तयार झाला.

ऐश्वर्या राय बच्चन- हीरोइन

मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोइन’ सिनेमात ऐश्वर्या राय होती. तिच्यासोबत सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले होते, मात्र ऐश्वर्याची या सिनेमा दरम्यान प्रेग्नेंसी आली आणि तिला हा सिनेमा सोडावा लागला.

कंगना रनोट- द डर्टी पिक्चर

विद्या बालन आधी हा सिनेमा कंगनाला ऑफर झाला होता. मात्र तिला एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नसल्याने तिने या सिनेमाला नकार दिला. नंतर कंगनाने सांगितले होते की, विद्याने या सिनेमात खूप सुंदर काम केले.

रणवीर सिंह- बॉम्बे वैल्वेट

अनुराग कश्यप ने एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना बॉम्बे वैल्वेट चित्रपटात जॉनी बलराजच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग पाहिजे होता, मात्र तेव्हा त्याची फी खूप जास्त असल्याने रणबीर कपूरला घेणयात आले.

शाहरुख खान- रंग दे बसंती

डायरेक्टर राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले की, रंग दे बसंती सिनेमात त्यांना आमिर आणि शाहरुख यांना सोबत घेऊन काम करायचे होते. त्यांनी शाहरुखला अजय राठौड़च्या भूमिकेसाठी विचारला केल्यावर शाहरुखने इतर चित्रपटांमध्ये बिझी असल्याचे सांगत हा रोल नाकारला होता.

ऋतिक रोशन- स्वदेश

स्वदेश या सिनेमात नासाच्या साइंटिस्ट मोहन भार्गवची भूमिका सर्व प्रथम ऋतिक रोशनला विचारली गेली होती. तेव्हा त्याने काही कारणाने या भूमिकेला नकार दिला. शाहरुखने ही भूमिका साकारत खूप वाहवा मिळवली.

करीना कपूर- कहो ना प्यार है

रिफ्यूजी सिनेमा आधीच करीना कहो ना प्यार है सिनेमातून पदार्पण करणार होती. तिने या सिनेमाचा एक सिंही शूट केला होता, मात्र ऋतिकच्या भूमिकेसमोर ओवर शैडो होण्याच्या भीतीने तिने हा सिनेमा नाकारला. मग हा रोल अमिषाला मिळाला. का चित्रपट सुपरहिट झाला तर रिफ्यूजी फ्लॉप.

हे देखील वाचा