Thursday, December 5, 2024
Home साऊथ सिनेमा लग्नाच्या अफवांवर कीर्ती सुरेशने साेडले माैन; ट्विट करत म्हणाली, ‘हाहाहा!! या वेळी माझा खास मित्र…’

लग्नाच्या अफवांवर कीर्ती सुरेशने साेडले माैन; ट्विट करत म्हणाली, ‘हाहाहा!! या वेळी माझा खास मित्र…’

साऊथ स्टार कीर्ती सुरेश नुकतीच ‘दसरा’ या चित्रपटात दिसली. मात्र, काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे चांगलीच प्रसिद्धीच्या झाेतात आली हाेती. खरे तर, अभिनेत्री दुबईतील एका व्यावसायिकासोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा हाेती. अशात आता या सगळ्यावर कीर्ती सुरेशने मौन साेडले आहे. या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही आणि गरज पडल्यास ती नक्कीच तिच्या मिस्ट्री मॅनचा खुलासा करेल असे कीर्तीने सांगितले आहे.

कीर्ती सुरेश ( keerthy suresh) हिचा फरहान नावाच्या व्यक्तीसोबतचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. अशात कीर्ती या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या चर्चांमुळे कीर्तीच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल जाणून घेण्याची चांगलीच उत्सुकता हाेती, ज्याबाबत आता किर्तीने खुलासा केला आहे.

अभिनेत्रीच्या अफेअरच्या अफवा पसरताच कीर्तीने यावर माैन साेडले असून ट्विटर पोस्टमध्ये लिहिले, ‘हाहाहा!! या वेळी माझा खास मित्र या सगळ्यात ओढायचा नव्हता! जेव्हाही मी या रियल मिस्ट्री मॅनचा खुलासा करेल तेव्हा मी सर्वांसमाेर आणेन. ताेपर्यंत चिल पील करा. मग मी म्हणेन की ते योग्य नव्हते.’

कीर्ती सुरेश हिचे हृदय खूप मोठे आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दसरा’ चित्रपटाचे शेवटचे शूट संपल्यावर कीर्तीने तिच्या सेटवर उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सोन्याची नाणी वाटली. मंडळी, आम्ही तुम्हाला सांगतो की, यावेळी सेटवर 130 लोक उपस्थित होते आणि कीर्तीने ड्रायव्हरपासून लाईट मॅनपर्यंत सर्वांना सोन्याची नाणी देऊन शेवटचे शूट पूर्ण केले, ज्यावरून ती खूप चर्चेत होती. या नाण्यांची किंमत सुमारे 70 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.(Tollywood actress keerthy suresh reaction on wedding rumours says will reveal mystery man whenever i have to )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा