Sunday, June 22, 2025
Home साऊथ सिनेमा समंथाच्या ‘शकुंतलम’ची नवीन रिलीज डेट आली समाेर, ‘या’ दिवशी हाेणार चित्रपट प्रदर्शित

समंथाच्या ‘शकुंतलम’ची नवीन रिलीज डेट आली समाेर, ‘या’ दिवशी हाेणार चित्रपट प्रदर्शित

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा आगामी चित्रपट ‘शकुंतलम‘ची रिलीज डेट काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट आधी 17 फेब्रुवारीला रिलीज होणार होता. अशात आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. खरे तर, निर्मात्यांनी नवीन रिलीज तारखेसह ‘शकुंतलम’चे पोस्टर शेअर केले आहे.

14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार ‘शकुंतलम’
‘शकुंतलम’च्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, आता हा चित्रपट 14 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होण्याचे कारण सांगितलेले नाही. याआधीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दोनदा बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी 4 फेब्रुवारीला चित्रपटगृहात येणार होता, तो बदलून 17 फेब्रुवारीला करण्यात आला. त्यानंतर ही तारीखही बदलण्यात आली.

पौराणिक कथेपासून प्रेरित आहे ‘शकुंतलम’
‘शकुंतलम’ चित्रपटात समंथाने मेनका आणि विश्वामित्र यांच्या मुलीची शकुंतलाची भूमिका साकारली आहे. गुणशेखर निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा प्राेजेक्ट समंथाचा गुणशेखरसोबतची पहिली भागीदारी आहे. चित्रपटाची कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पौराणिक कथेपासून प्रेरित असून महान कवी कालिदासाच्या अभिज्ञान शकुंतलम या संस्कृत नाटकातून ती साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

नुकताच समंथाच्या ‘शकुंतलम’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. वरुण धवनने हा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटात समंथा आणि देव मोहन व्यतिरिक्त अल्लू अर्हा, सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला, जिशू सेनगुप्ता हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.( tollywood actress samantha ruth prabhu and dev mohan prakash raj starre film will release on 14 april)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कशी नशीबाने आज थट्टा मांडली! ‘द कपिल शर्मा शाे’चा स्टार सुनील ग्रोवर चालवताेय रिक्षा

अच्छा तर ‘हे’ रहस्य आहे काजोलचे गोरे होण्यामागे, पोस्ट शेअर करत केला खुलासा

हे देखील वाचा