Wednesday, July 3, 2024

धक्कादायक.! मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत प्रसिद्ध अभिनेत्री जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

दाक्षिणात्य अभिनेत्री शालू चौरसिया हिच्यासोबत चोरांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या छेडछाडी दरम्यान तिचा मोबाईलही चोरी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री शालू चौरसिया हीच्यासोबत चोरांची झटापट झाली. या दरम्यान ती घायाळ देखील आहे. यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शालू चौरसिया तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मोबाईलची चोरीची घटना रविवारी (१४ नोव्हेंबर) रोजी हैदराबादमध्ये झाली.

माध्यमातील वृत्तानुसार, मोबाईलच्या चोरीनंतर शालूने त्या चोराच्या विरोधात बंजारा हिल्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेत्रीसोबत ही घटना हैद्राबाद बंजारा हिल्सच्या केबीआर पार्कजवळ घडली आहे. शालू जेव्हा रात्री फिरायला बाहेर पडली तेव्हा एका व्यक्तीने तिच्या हातातील मोबाईल ओढून घेतला. (Actress shalu chaurasia has been hospitalized after injured in mobile snatching incident in Hyderabad)

Photo Courtesy: Shalu Chourasiya/ Social Media AC
Photo Courtesy: Shalu Chourasiya/ Social Media AC

अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तो व्यक्ती तिच्याजवळ आला आणि तिच्याकडे पैशांची आणि गरजेनुसार वस्तूंची मागणी करू लागला. परंतु तिने तिथेच त्याला नकार दिला. त्यानंतर शालूने त्याला बुक्का मारला आणि त्याच्या तोंडावर दगड फेकून मताला. परंतु तो तिचा मोबाईल घेऊन पळाला. या गडबडीत शालूच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागला.

यानंतर तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आहे. यानंतर तिने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याबाबत शोध चालू केला. पोलिस सध्या घटना स्थळी असलेले सिसीटीव्ही कॅमेरे चेक करत आहेत. हैद्राबाद बंजारा हिल्समध्ये या आधी देखील अशा घटना घडल्या आहेत. पोलिसांची याबाबत चौकशी चालू आहे. चोर हाती लागताच ते त्याला अटक करणार आहेत. तसेच शालू चौरसियाची तब्येत देखील आता ठीक आहे.

हेही वाचा –

जेव्हा सानिया मिर्झाच्या नोझपिनमुळे भोजपुरीमध्ये उडाला गोंधळ, ‘या’ कलाकारांना खावी लागली होती जेलची हवा

बाप रे! पॅराशूटची सवारी जोडप्याला पडली महागात, समुद्राच्या मध्यभागीच दोरी तुटली आणि…

कंगनाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील वक्तव्याचा राखी सावंतला बसला धक्का! रुग्णालयात करावे लागले दाखल

हे देखील वाचा