दुख:द! प्रसिद्ध टॉलिवूड निर्माते आर आर व्यंकट यांनी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास


टॉलिवूड निर्माते आर आर व्यंकट यांचे सोमवारी (२७ सप्टेंबर) सकाळी निधन झाले आहे. हैदराबाद येथील एआयजी या रुग्णालयात ते मागील काही दिवसांपासून ऍडमिट होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यू मागील कारण मूत्रपिंड निकामी असल्याचे सांगितले जात आहे. ते डिस्ट्रीब्यूशन हाउस आरआर मूव्ही मेकर्सचे मालक होते.

त्यांनी २०१२ मध्ये ‘डिव्होर्स इन्व्हिटेशन’ या इंग्रजी चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्येही प्रवेश केला होता. यामध्ये अभिनेता जोनाथन बेनेट मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन एस व्ही कृष्णा रेड्डी यांनी केले होते. हा चित्रपट त्यांच्या ‘आह्वानम’ या चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये श्रीकांत आणि रम्या कृष्णन हे मुख्य भूमिका साकारताना दिसले होते. याच्या व्यतिरिक्त आर आर व्यंकट यांनी अनेक तेलुगु चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना अनेक चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांनी पुरस्कार मिळालेल्या रोमँटिक थ्रिलर हिंदी चित्रपट ‘एक हसीना थी’ची निर्मितीही केली. व्यंकट यांनी मागील अनेक वर्षांपासून निर्माता म्हणून काम केले. (Tollywood producer RR Venkat took his last breath during the treatment)

त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण चित्रपट विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतकेच नव्हे तर त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट विश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे.

व्यंकट हे इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध निर्माता आणि वितरक होते. त्यांनी आपल्या बॅनरखाली अभिनेता महेश बाबूंच्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्यांच्या निर्मितीमध्येच ‘बिझनेसमन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर एनटीआरचा ‘आंध्रवाला’, नागार्जुन यांचा ‘डमरुकम’, रवी तेजाचा ‘मिरापाके’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरले होते. त्याचबरोबर त्यांना बिग बजेट चित्रपट निर्मितीसाठी ही ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच


Leave A Reply

Your email address will not be published.