×

हॉलीवूडस्टार असणाऱ्या टॉम क्रूजचा रागावर नाही ताबा, एक्स मॅनेजरला फेकून मारला होता अल्बम

हॉलिवूडमधील तुफान लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून टॉम क्रूज़ (Tom Cruise) ओळखला जातो. फक्त हॉलीवूडच नाही तर संपूर्ण जगात त्याची अमाप फॅन फॉलोविंग आहे. आपल्या दंडार अभिनय आणि ऍक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या टॉम क्रूज़चे सिनेमे बॉक्स ऑफिसवर देखील पैशाचा पाऊस पडतात. वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत असणाऱ्या टॉम क्रूजबद्दल एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीने केला असून, यात त्याच्या एका वाईट सवयींबद्दल सांगण्यात आले आहे.

टॉम क्रूजची पूर्वीची मॅनेजर असलेल्या एलीन बर्लिन (Eileen Berlin) ने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्याला खूपच लवकर अगदी टोकाचा राग येतो. राग आल्यानंतर तो खूपच वेगळ्या प्रकारे वागतो. या मुलाखतीमध्ये तिने त्याच्या रागाचे अनेक किस्से सांगितले आहे. एलीन बर्लिन या मुलाखतीमध्ये अनेक मोठे आणि धक्क्यादायक खुलासे करत टॉम क्रूजवर काही गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात टॉम क्रूजचा राग अतिशय टोकाचा असायचा. अगदी लहान सहान गोष्टींवर तो चिडायचा.

एक दिवस तर त्याने रागाच्या भरात एलीनच्या तोंडावर अल्बम फेकून मारला होता. ती म्हणाली की, “मी त्याच्या १९ व्या वाढदिवसाला एक अल्बम गिफ्ट केला होता. ज्यात त्याचे सर्व पब्लिसिटी आर्टिकल एकत्र केलेले होते. हा अळंबीम पाहून तो ओरडला आणि म्हणाला मला टिन मासिकांमध्ये नाही राहायचे. आणि त्याने तो अल्बम मला मारून फेकला मला चेहऱ्याला दुखापत देखील झाली होती.” एलीनने टॉम क्रूजसोबत त्या काळात काम करायला सुरुवात केली जेव्हा तो १८ वर्षाचा होता. टॉम क्रूजचे करिअर कठीण काळातून जात असताना एलीनने त्याला स्वतःच्या घरात राहू दिले होते.

या मुलाखतीमध्ये ८६ वर्षीय एलीनने त्या फोटोना आणि हेडशॉट्स देखील दाखवले. पुढे एलीनने सांगितले की, टॉम क्रूज त्याच्या लुकला घेऊन खूपच असुरक्षित होता. त्याने त्याच्या पहिल्या पब्लिसिटी हेडशॉटसाठी पूर्ण दिवस पोझची तयारी केली होती. एलीन आणि टॉम यांचे नाते इतके जुने आहे की ती त्याला टॉमी म्हणून हाक मारते. तिने अजून एक किस्सा सांगताना म्हटले की, “बोलणे न ऐकणे, अहंकार, निराशा, आकर्षण आणि उदासी त्याला तिने आदी सर्व मूड्समध्ये पाहिले आहे. मात्र तिने त्याला कधीही खऱ्या आनंदात पाहिले नाही.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post