Thursday, October 16, 2025
Home अन्य Horror: तुम्हाला घाबरवयाला सज्ज आहेत ‘या’ पाच थरारक वेबसीरिज, कथा ऐकूनच येतील अंगावर शहारे!

Horror: तुम्हाला घाबरवयाला सज्ज आहेत ‘या’ पाच थरारक वेबसीरिज, कथा ऐकूनच येतील अंगावर शहारे!

ओटीटीच्या जगात वेबसीरिज चित्रपटांवर वर्चस्व गाजवत आहेत. ओटीटीवर दररोज नवीन कंटेंट प्रदर्शित होत आहे. वेबसीरिजच्या जगात हॉरर सीरिजचे प्रचंड फॉलोव्हर्स आहेत आणि त्यांचे फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. अशा परिस्थितीत टॉप ५ हॉरर वेबसीरिज शोधणे थोडे कठीण आहे. पण आज आम्ही तुमच्या सर्वांसाठी काही उत्कृष्ट भारतीय हॉरर वेबसीरिजची यादी आणली आहे, जी पाहून तुम्हाला खरोखर भीती वाटेल. त्यांना पाहून तुम्ही तुमचा चांगला वेळ घालवू शकता.

परछाई: रस्किन बॉन्ड की घोस्ट स्टोरीज (झी ५)
जेव्हा लोक पुस्तकांनी स्वतःचे मनोरंजन करायचे तेव्हा रस्किन बाँडच्या कथा वाचकांना घाबरवण्यासाठी वापरल्या जायच्या. त्याच्या कथांवर आधारित ‘परछाई’ ही १२ भयकथांची सीरिज आहे. जी तुम्हाला नक्कीच घाबरवेल आणि तुमचे मनोरंजन देखील करेल.

घोल (नेटफ्लिक्स)
यात राधिका आपटे (Radhika Apte) ही निदा रहीम या लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे आणि अलीकडेच लष्कराने पकडलेला जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी अली सईद याची चौकशी करण्याचे काम तिच्याकडे आहे. तो उत्तर देण्यास नकार देतो. निदाचा असा विश्वास आहे की, सईदला काही दुष्ट आत्म्याने पछाडले आहे आणि हा आत्मा त्या सर्वांना मारण्यासाठी आला आहे. ‘घोल’चे फक्त तीन एपिसोड आहेत. पण ते इतके छान आहेत की, तुम्हाला त्याचा आनंद मिळेल.

भ्रम (जी ५)
‘भ्रम’ ही सायको-हॉरर थ्रिलर कथा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या कादंबरीवर आधारित आहे. ती शांतता शोधण्यासाठी एका हिल स्टेशनवर जाते. पण तिथे तिला तिच्या घराभोवती एक मुलगी दिसायला लागते. कादंबरीकार म्हणून कल्की केकलाने दमदार अभिनय केला आहे. तुम्ही सर्वजण झी ५ वर ही सीरिज पाहू शकता.

गहराइयां (विउ)
रेना कपूर (संजीदा शेख) ही एक गूढ भूतकाळ असलेली महिला सर्जन आहे. आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी ती बंगलोरहून मुंबईत येते. तिच्यासोबत झालेल्या विचित्र घटनांमुळे ती पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरसाठी औषधे घेण्यास सुरुवात करते. ती इथे स्थायिक होण्याच्या बेतात असतानाच तिला आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असे वाटू लागते. ‘गहरायां’ हे विक्रम भट्ट यांनी तयार केले आहे आणि तुम्ही ते विउवर पाहू शकता.

टाइपराइटर (नेटफ्लिक्स)


सुजॉय घोषची पाच एपिसोड असलेली ‘टाइपराइटर’ ही हॉरर वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. काही विचित्र मृत्यू आहेत आणि शेवटी जे प्रकट होते ते पाहण्यासारखे आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा