Friday, November 22, 2024
Home भोजपूरी भोजपुरी इंडस्ट्रीतील ३ ‘बिग’ बजेट चित्रपट; जे बॉलिवूडलाही देतात टक्कर; एक लंडनमध्ये झालाय शूट

भोजपुरी इंडस्ट्रीतील ३ ‘बिग’ बजेट चित्रपट; जे बॉलिवूडलाही देतात टक्कर; एक लंडनमध्ये झालाय शूट

भोजपुरी सिनेमाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. आज उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसारख्या इतर राज्यांमध्ये भोजपुरी चित्रपटांना खूप पसंती दिली जात आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इतर राज्यांतील प्रेक्षकही भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांमध्ये रस दाखवत आहेत. भोजपुरी चित्रपटांना भारतातच नव्हे, तर परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे भोजपुरी चित्रपट आता दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनाही टक्कर देत आहेत. आता भोजपुरी चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनू लागले आहेत. चला, तर मग भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक बजेट असलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

वीर योद्धा महाबली
निरहुआच्या ‘वीर योद्धा महाबली’ या चित्रपटाने भारतातच नव्हे, तर परदेशातही खूप नाव कमावले आहे. हा चित्रपट हिंदी, भोजपुरी, तमिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी एक भव्य सेट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाचे बजेट सुमारे १० कोटी इतके होते.

निरहुआ चलल लंदन
भोजपुरी सिनेमाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट म्हणजेच दिनेश लाल यादव उर्फ ​​निरहुआ स्टारर ‘निरहुआ चलल लंदन’ होय. या चित्रपटाचे बजेट सुमारे ४ कोटी रुपये होते. ’निरहुआ चलल लंदन’ या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भोजपुरी चित्रपटात पहिल्यांदा ५ कोटींची कार वापरली गेली होती. ‘निरहुआ चलल लंदन’ चित्रपटाचे चित्रीकरण नेपाळ, लंडन व्यतिरिक्त युरोपच्या ५ देशांमध्ये करण्यात आले आणि हा एकमेव भोजपुरी चित्रपट होता जो परदेशात चित्रित करण्यात आला होता.

मैं सेहरा बांध के आऊंगा
अभिनेता खेसारीलाल यादव ‘मैं सेहरा बांध के आऊंगा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट भोजपुरी सिनेमातील तिसरा सर्वात महागडा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे बजेट सुमारे २ कोटी होते. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडच्या खैरी गावात झाले होते.

हे तीन चित्रपट भोजपुरी सिनेमाचे सर्वात महागडे चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या निर्मितीवर इतका खर्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे चित्रपट अनेक बॉलिवूड चित्रपटांपेक्षा अधिक बजेटचे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

-Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने

-‘अधूरा’चा फर्स्ट लूक रिलीझ: शेवटचे एकत्र दिसणार ‘सिडनाझ’, चाहत्यांना अनावर झाल्या भावना

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा