Monday, July 1, 2024

श्वास रोखून धरा! २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर ‘हे’ ऐतिहासिक सिनेमे घालणार धुमाकूळ, ‘गंगूबाई…’चाही समावेश

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक नावीन्यपूर्ण आणि ऐतिहासिक कथा घेऊन चित्रपट तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ असो किंवा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ असो, या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच अशाप्रकारचे अनेक चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कोणते आहेत असे लोकप्रिय ऐतिहासिक चित्रपट चला जाणून घेऊ.

सध्या प्रेक्षकांना ऐतिहासिक आणि होऊन गेलेल्या अनेक घटनांवर आधारित चित्रपट पाहणे आवडू लागले आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातसुद्धा पावनखिंड, बाजिंद सारख्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यामुळेच आगामी काळात अनेक दर्जेदार ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पृथ्वीराज
यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. याच चित्रपटातून ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर हिंदी चित्रपट जगतात दमदार पदार्पण करत आहे. चित्रपटात मानुषीसोबत अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) झळकणार आहे. त्याने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता सोनू सूद आणि संजय दत्त यांनीही भूमिका साकारल्या आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

गंगूबाई काठियावाडी
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. महिला गुन्हेगारी जगतावर आधारित असणारा हा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गंगूबाई ही मुंबईच्या कामाठिपुरा भागातील एक महिला डॉन म्हणून प्रसिद्ध असते. गंगूबाई करीम लाला नावाच्या सराईत गुन्हेगाराला राखी बांधून ती सुद्धा गुन्हेगारी जगतात नावारूपाला येते. अशी या चित्रपटाची कहाणी आहे. चित्रपटातील आलिया भट्टच्या (Alia Bhatt) डॅशिंग लूकने सध्या सर्वांनाच थक्क केले आहे.

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh

द गुड महाराज
हिंदी चित्रपटसृष्टीतील आगामी ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत ‘द गुड महाराज’ चित्रपटाचा देखील समावेश आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा १९१९ मध्ये ब्रिटिश सैन्यात लेफ्टनंट असलेले महाराजा दिग्विजयसिंझी रंजितसींझ यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट येत्या २२ जुलै, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रम्हास्त्र
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची कथा थेट हजारो वर्षांपूर्वीची आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी भूतकाळ आणि वर्तमानकाळचा संबंध पौराणिक संबंध जोडला आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या चित्रपटात भगवान शंकराचा अंश असलेली भूमिका साकारणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट हिंदी सोबतच कन्नड, मल्याळम, तेलुगू अशा अनेक भाषांत प्रदर्शित होणार आहे.

शमशेरा
‘शमशेरा’ हा चित्रपटसुद्धा एका ऐतिहासिक कथेवर आधारित आहे. यशराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे.

चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त यांच्यासोबत अभिनेत्री वाणी कपूरसुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे देखील वाचा