Ranbir & Alia | ‘आपलं लग्न कधी होणार?’ रणबीरने सर्वांसमोर थेट प्रश्न विचारताच लाजेने चूर झाली आलिया


अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. ब्रह्मास्त्र (brahmastra) चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच लॉन्च करण्यात आला. यावेळी हे दोघेहीजण उपस्थित होते.

यान मुखर्जी (ayan Mukherjee) यांनी पोस्टर लॉन्चिंगवेळी चित्रपटाला बनवण्यास इतका वेळ का लागला याबद्दल सांगितले. अयान मुखर्जी यांचा ब्रह्मास्त्र हा पहिलाच चित्रपट आहे. आणि या चित्रपटांमध्ये त्यांनी खऱ्या आयुष्यातील जोडप्याला घेतले आहे. ते म्हणजे आलिया भट्ट आणि रणवीर कपूर. हे दोघेही या चित्रपटात काम करणार आहेत. त्यामुळे चित्रपटाचा पोस्टर लॉन्चिंगवेळी आलिया आणि रणबीरमध्ये खूप चांगले बॉण्डिंग असल्याचेही पाहायला मिळाले.

‘R’ फॅक्टरबद्दल आलियाला प्रश्न…

पोस्टर लाँचिंगवेळी मुलाखतीमध्ये रणबीर आणि आलिया खूप मस्तीच्या मुडमध्ये दिसून आले. रणबीरने आलियाला असे विचारले की तुझ्या जीवनात आर (R) फॅक्टर कोण आहे? तुला सर्व प्रेक्षक हाच प्रश्न विचारतात तू जिकडे कुठे जातेस तेव्हा. त्यामुळे सर्व जगाला सांगून टाक कोण आहे. हे ऐकताच आलिया भट्ट कमालीची लाजल्याचे सर्वांनी पाहिले. आणि ती देखील रणबीरला विचारते की तुझ्या जीवनात A फॅक्टर कोण आहे.

अधिक वाचा – KIARA ADVANI | अभिनेत्री कियारा आडवाणीची चाहत्यांना खुशखबर, केली कोटीची खरेदी

एक असा काळ होता की सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर एकच प्रश्न होता की सलमान खान कधी लग्न करणार? आता हाच प्रश्न प्रेक्षकांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला विचारला.

लग्नाविषयीचा प्रश्न आणि कलाकारांची उत्तरे…

रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाविषयी काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. पण नेहमी हेच ऐकायला मिळते की या दोघांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता हे जोडपे २०२२ च्या सुरुवातीला लग्न करणार आहेत. रणबीरने मुंबईमध्ये नवीन घर देखील बनवले.

जेव्हा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सोबत असतात, तेव्हा त्यांच्या लग्नाविषयी हमखास प्रश्न विचारले जातात. रणबीर कपूरला त्याच्या एका चाहत्याने ब्रह्मास्त्र पोस्टर लॉन्चिंग दरम्यान एक प्रश्न विचारला तू आलिया भट्टशी लग्न करणार आहे, की दुसऱ्या कुणाशी करणार आहे? यादरम्यान रणबीर आलियाला बोलतो की, आपले लग्न कधी होणार. आलिया लाजते आणि बोलते की हे मला का विचारतोयस तू. याच्यावर ब्रह्मास्त्र चित्रपटाचे निर्माते अयान मुखर्जी बोलतात की, अशीही एक तारीख पुरेशी आहे.

हेही वाचा –


Latest Post

error: Content is protected !!