Wednesday, January 21, 2026
Home साऊथ सिनेमा कमी वयातच आरती अग्रवालने चित्रपटांमध्ये गाजवले वर्चस्व, लठ्ठपणा दूर करण्यासाठी वेदनादायक शस्त्रक्रियेने घेतला जीव

कमी वयातच आरती अग्रवालने चित्रपटांमध्ये गाजवले वर्चस्व, लठ्ठपणा दूर करण्यासाठी वेदनादायक शस्त्रक्रियेने घेतला जीव

टॉलिवूड अभिनेत्री आरती अग्रवालने १५ वर्षे तेलुगू चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री सुपरस्टार चिरंजीवीने सोनाली बेंद्रेच्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २२ चित्रपट केलेल्या आरती अग्रवालचा चित्रपट प्रवास जरी उत्कृष्ट राहिला असला, तरी तिचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या वेदनादायी कथेपेक्षा कमी नव्हते. आरती अग्रवालचा शनिवारी (५ मार्च) ३८वा वाढदिवस आहे.

नवीन जर्सीमध्ये झाला जन्म

आरती अग्रवालचा (Aarthi Agarwal) जन्म ५ मार्च १९८४ रोजी न्यू जर्सी येथील गुजराती कुटुंबात झाला. तिचे वडील एक यशस्वी व्यापारी होते. ती एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री होती. जिने प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम केले. माध्यमांतील वृत्तानुसार, आरती अग्रवालला बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीकडून चित्रपटांमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. खरं तर, सुनील शेट्टीने त्याच्या एका डान्स कार्यक्रमादरम्यान स्टेजवर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आरतीला डान्स करायला बोलावले होते. आरतीच्या छोट्याशा डान्सने सुनील शेट्टी इतका प्रभावित झाला की, त्याने अभिनेत्रीच्या वडिलांनाही आरतीसाठी बॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर दिली.

आरती अग्रवाल

लहान वयात केले पदार्पण 

या भेटीनंतर आरती आणि तिच्या कुटुंबीयांना अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याची स्वप्ने पडू लागली आणि संधी मिळताच त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी आरतीला चित्रपटांमध्ये पाठवले. आरतीने २००१ मध्ये बॉलिवूड चित्रपट ‘पागलपन’ आणि साउथ चित्रपट ‘नुव्वू नाकू नचाव’ या दोन्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. आरतीची फिल्मी कारकीर्द खूपच लहान होती. पण या कारकिर्दीत तिने चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, रवी तेजा, जूनियर एनटीआर, प्रभास यांसारख्या साऊथच्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले.

आरती अग्रवाल

वयाच्या २३ व्या वर्षी केले लग्न 

अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत एकूण २५ चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात तेलगू, तमिळ आणि हिंदी या तिन्ही उद्योगांमधील चित्रपटांचा समावेश होता. तिच्या फिल्मी करिअरसोबतच आरती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहायची. माध्यमांतील वृत्तानुसार अभिनेत्रीने वयाच्या २१ व्या वर्षी तिचा आणि तिचा प्रियकर तरुण यांच्यातील ब्रेकअपमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर अभिनेत्रीने २३ व्या वर्षी लग्नगाठ बांधली. मात्र, तिचे नाते काही ठसले नाही आणि दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.

‘या’ आजाराने होती ग्रस्त 

तिच्या अभिनयावर नाव कमावल्यानंतरही, अभिनेत्री तिच्या आयुष्यात आनंदी नव्हती, त्याचे मुख्य कारण तिचे आजारपण होते. आरतीला लठ्ठपणाचा त्रास होता आणि त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. तिच्या वाढत्या लठ्ठपणामुळे तिला चित्रपटात काम मिळणे बंद झाले.

लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी लिपोसक्शन करण्यात आली शस्त्रक्रिया

आपल्या लठ्ठपणामुळे आरती इतकी नाराज झाली होती की, ती कमी करण्यासाठी तिने शस्त्रक्रियेचा सहारा घेतला. लठ्ठपणा दूर करण्यासाठी अभिनेत्रीने ‘लायपोसक्शन सर्जरी’ केली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ती हैदराबादमधील डॉक्टरांना भेटली तेव्हा डॉक्टरांनी तिला ही शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला दिला. पण ती तिच्या आजाराने कंटाळली होती आणि त्यातून मुक्त होण्यासाठी काहीही करायला तयार होती.

आरतीने लायपोसक्शन शस्त्रक्रिया करून शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकली होती. परंतु तिला इतर अनेक समस्या जाणवू लागल्या. ऑपरेशननंतर आरतीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचे सांगण्यात आले होते. तिला उपचारासाठी न्यू जर्सी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच आरतीचा मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर, ती लठ्ठपणा आणि फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होती आणि उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. आरतीने वयाच्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता.

हेही वाचा –

हे देखील वाचा