Friday, March 29, 2024

मर्डर मिस्ट्री ते अफेअरपर्यंत अजय देवगणची ‘रुद्र’ सायको थ्रिलर वेबसिरीजकरणार धमाल एंटरटेनमेंट

जर तुम्हाला सायको थ्रिलर चित्रपट आणि वेबसिरीज आवडत असतील, तर या वीकेंडला अजय देवगणच्या ‘रुद्र’पासून ते ‘अथिरन’ पर्यंत, तुम्ही या चित्रपट आणि वेबसिरीज तुमचे मनोरंजन करू शकता. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘कौन’ हा एक सायको सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट युट्यूबवर पाहता येईल.

‘सायको’ या चित्रपटात आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहे. एका रेडिओ जॉकीचे अपहरण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या कथेत जबरदस्त सस्पेन्स जोडण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि युट्यूबवर पाहता येईल. सायलेन्स कॅन यू हिअर हा एक सायको सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. मर्डर मिस्ट्रीवर आधारित या सीरिजमध्ये जबरदस्त थरार आहे. या चित्रपटात प्राची देसाई आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

साउथ सायको थ्रिलर चित्रपटात साई पल्लवी आणि फहद फाजील यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सिनेमाची कथा आणि ऍक्शन जबरदस्त आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहता येईल.चेकरबोर्ड वेबसिरीज मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर पाहता येईल.

‘रुद्र’ ही एक सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. या मालिकेद्वारे अजय देवगण ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. डिझनी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज पाहता येईल. ‘बेदाद’ ही सायको थ्रिलर वेबसिरीज आहे. या सीरिजची कथा सस्पेन्सने भरलेली आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये समाजात मानाचा मुखवटा घातलेल्या लोकांची कहाणी दाखवण्यात आली आहे, पण त्यांचे वास्तव काही वेगळेच आहे. टॉकीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहता येईल. अमेझॉन प्राईम व्हिडिओची वेबसीरिज ‘पाताल लोक’ खूप लोकप्रिय झाली आहे. ‘पाताल लोक’मध्ये जबरदस्त सस्पेन्स दाखवण्यात आला आहे. ही सीरिज ओटीटीवर पाहता येईल.

कथा काय आहे

रुद्र ही एक शक्तिशाली पोलिस, रुद्रवीर सिंग (अजय देवगण Ajay Devgan) ची कथा आहे. जो गुन्हेगारांना त्यांच्या योग्य ठिकाणी नेण्यासाठी जातो. त्यासाठी रुद्रला नियमांचे उल्लंघन करावे लागले तरी चालेल. मात्र, या कामाच्या आवडीमुळे अनेकवेळा रुद्रच्या विभागाला आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

रुद्र ही ब्रिटिश सीरिज ल्यूथरचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्याचे एकूण ६ भाग आहेत. शोच्या एका एपिसोडची कथा दरोड्याशी संबंधित आहे. त्याचवेळी उर्वरित पाच भाग खून रहस्यावर आधारित आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुद्रच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला वेगळी कथा पाहायला मिळते. जे पाहून तुम्हाला बॉलिवूडमधील गुन्हेगारीवर बनवलेले चित्रपट आठवतील.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा