Saturday, June 29, 2024

‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान या दिवसात त्याच्या झालेल्या ट्रान्स्फॉर्मेशनमुळे खूपच चर्चेत आहे. बरेच दिवस लाईमलाईटपासून लांब राहिल्यानंतर तो जबरदस्त कमबॅकची तयारी करत आहे. यासाठी त्याने सगळ्यात आधी त्याच्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे. फरदीनने त्याचा पूर्ण लूक बदलला आहे. नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहे. त्याने त्याच्या हेअर स्टाईलमध्ये देखील खूप बदल केला आहे. 

फरदीन खानला एका सलूनच्या बाहेर स्पॉट केले गेले आहे. या फोटोत त्याने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. सोबतच सलूनच्या आतमधील काही फोटो देखील समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना फरदीनला ओळखणे कठीण झाले आहे. त्याचा हा फोटो हेअर स्टायलिश आलिम हकीम याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोत अलीमने फरदीनचे मागून आरश्यापुढे बसलेला फोटो काढला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim)

या फोटोतील फरदीनचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. सगळेजण त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे खूप कौतुक करत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याच कारणांमुळे तो त्याच्या लूक्सकडे आणि फिटनेसकडे एवढे लक्ष देत आहे.

सन 2020 मध्ये एका मुलाखतीत फरदीनने त्याचे 18 किलो वजन कमी केल्याचे सांगितले होते. त्याने सांगितले होते की, फिटनेस आल्यावर त्याला स्वतःला 25 वर्षाचे असल्याचे फील करायचे आहे. त्याने ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्काला आठवले बालपणीचे जुने दिवस; व्हिडिओ शेअर करत म्हणाली,’इथेच मी पोहायला…’

सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’

हे देखील वाचा