बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याच्या लोकप्रिय वेबसीरिज ‘आश्रम‘ मधील बबिता नावाचे पात्र चांगलेच गाजले होते. हे पात्र इतर कोणी नाही तर 28 वर्षाची अभिनेत्री त्रिधा हिने निभावले होते. प्रकाश झा यांच्या या वेबसीरिजमध्ये अभिनेत्रीने बॉबी देओलसोबत एक इंटीमेट सीन दिला होता. या सीननंतर ती खूप जास्त चर्चेत आली होती. अशातच त्रिधाने बुधवारी (22 नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा केला. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.
त्रिधा चौधरीचा जन्म 22 नोव्हेंबर, 1993मध्ये कोलकत्ता येथे झाला. ‘आश्रम’मध्ये काम करण्यासोबतच तिने भोजपूरीपर्यंत तिच्या अभिनयाचा प्रवास पूर्ण केला आहे. केवळ वेबसीरिजमध्ये नाही, तर खऱ्या आयुष्यात देखील ती खूपच बोल्ड आहे. तिच्या या बोल्डनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या लूकचे लाखो दीवाने आहेत.
View this post on Instagram
त्रिधाचे सोशल मीडियावर दोन मिलियनपेक्षाही अधिक फॉलोव्हर्स आहेत. तिने बंगाली चित्रपटसृष्टीतील तिच्या करिअरला सुरुवात केली. तसेच ती साऊथमधील ‘सूर्या व्हर्सेस सूर्या’ या चित्रपटात देखील दिसली आहे.तसेच तिच्या सौंदर्याची जादू भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आहे. तिने पवन सिंगच्या एका होळीच्या गाण्यावर डान्स केला होता.
त्रिधाने अगदी कमी वयात तिचे नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तर ती खूप लोकप्रिय आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला जोरदार प्रतिसाद देत असतात. तिने 2013साली तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी ती केवळ 19 वर्षाची होती. त्यानंतर 2020मध्ये तिने ‘आश्रम’ वेबसीरिजमध्ये काम केले. तसेच तिने ‘चार्जशिट’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. (Tridha Choudhary entered the film industry when she was just 19 years old)
आधिक वाचा-
–धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल? सिनेसृष्टीत उडाली खळबळ
–‘टायगर 3’ला 11व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बसला झटका, केली अगदीच कमी कमाई