तृप्ती डिमरी आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्त्र’ या ॲक्शनपटात हे दोन्ही स्टार्स एकत्र दिसणार आहेत. विशालचा हा चित्रपट अभिनेत्रीने साईन केला आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन आधीच सुरू आहे आणि हा चित्रपट 6 जानेवारी 2025 पासून फ्लोरवर जाणार आहे. या चित्रपटासाठी एक मोठा स्टुडिओ बांधण्यात आला असून, त्यामुळे चित्रपटाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या या चित्रपटासाठी भव्य सेट तयार करण्यात येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटाचे शूटींग लवकरच पूर्ण करून २०२५ मध्ये तो भव्य रिलीज करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
तृप्ती दिमरी यांचे वर्ष खूप छान होते. तिच्या चित्रपटांमुळे ती सतत ट्रेंडमध्ये राहिली. या अभिनेत्रीला समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही दाद मिळाली. आता ती 2025 साठी तयारी करत आहे. तिच्या प्रभावी कामगिरीने तिला ‘IMDb’ च्या टॉप-रेटिंग अभिनेत्रींमध्ये देखील स्थान मिळवून दिले आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने या वर्षात अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. तिने 2024 ची सुरुवात ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’, ‘बॅड न्यूज’ आणि ‘भूल भुलैया 3’ यासह अनेक थिएटरिकल हिटसह केली. आता ती शाहिद कपूरसोबत ‘अर्जुन उस्त्र’ या आगामी चित्रपटात मन जिंकण्यासाठी सज्ज आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
छान किती दिसते फुलपाखरू ! प्राजक्ता माळीचा रंगीबेरंगी लूक व्हायरल
जंजीर आणि दिवारच्या यशात मागे राहिलेल्या मजबूरची दास्तान; चित्रपटाने केली पन्नाशी पूर्ण…