Saturday, June 29, 2024

ट्रोलिंग आणि द्वेषामुळे अभिनेत्रीच्या मानसिक आरोग्यावर होतो परिणाम; स्वरा म्हणाली, ‘मी डॉक्टरांचा…’

सध्या बॉलिवडची अवस्था खूपच खराब झाली आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे चालत नाहीयेत. यामुळे बॉलिवूडवर टीका केली जात आहे. बॉलिवूडचे चित्रपट एका पाटोपाट असे आदळत असल्याने याचा चांगलाच फटका कलाकारांनाही बसला आहे. अशातच बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाॅयकाॅट ट्रेंडमुळे हाेणाऱ्या मानसिक तणावाविषयी बाेलली आहे.

एका मुलाखतीदरम्यान स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने सांगितले की, “भीतीदायक वातावरण आहे. ही एक इंडस्ट्री आहे, वादात न फसण्याचा विचार आहे. या व्यवसायात एक वास्तविक विश्वास आहे की, कधी कुठला विवाद झाला, तर त्याविषयी विचार न करणे सर्वात याेग्य मार्ग आहे. मागील काही वर्षांविषयी बाेलताना, करण जाेहर आणि काही बाकी लिस्टर्सना सुशांत सिंग राजपूतला वेगळं करण्यात आणि त्याला आत्महत्येसाठी उत्तेजक करण्यासाठी निशाणा बनवण्यात आले आणि त्यावर हल्ला करण्यात आला.”

यावर स्वरा म्हणाली, “म्हणूनच माझ्यावर जेव्हाही प्रहार करण्यात येताे, त्यावेळी मी काहीही बाेलत नाही. तुम्ही करण जाेहरच्या संबंधित बऱ्याच विषयावर बाेलू शकता. तुम्ही विचार करू शकता की, त्याचे चित्रपटात काही तथ्य नाही आणि नेपाेटिझमचा विषय आहे. मात्र, तुमच्या नावडीचा हा अर्थ नाही की, ताे एक हत्यारा आहे.”

आपल्या आधीच्या वक्तव्याबद्दल बाेलताना ती म्हणाली की, “बाॅयकाॅट ट्रेंड हा पैसे देऊन चालवला जाताे. मला माहित आहे कारण की, त्यातील काही माझ्याजवळ प्रस्ताव घेऊन आले हाेते. हे लाेक डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी इतरांना पैसे देऊन कामावर घेतात.” ती म्हणाली, “हा बाॅलिवूडसाठी सामान्य वेळ नाही आणि अशातच इंडस्ट्रीवर बॉयकॉट ट्रेंड्स सुरू आहे. जर चित्रपट व्यवसायातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन काम केले, तर हल्ला कमी हाेईल.”

स्वरा कायमच साेशल मीडियावर ट्राेलिंगचा शिकार हाेते. इतकंच नाही, तर अनेकदा तिला साेशल मीडियावर धमक्या देखील दिल्या जातात आणि या सगळ्याचा तिला मानसिक त्रास हाेताे. तिचा मानसिक त्रास कमी हाेण्यासाठी ती अनेक संघर्ष करते. ती म्हणाली, “मी माझ्या सर्व समस्याबद्दल माझ्या डाॅक्टरांशी नियमित बाेलते.”

स्वरा भास्कर लवकरच ‘जहाँ चार यार’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या बाॅयकाॅट ट्रेंडवरही स्वराने आपलं मत मांडलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पॅपराजींनी राजू यांच्या निधनावर तापसीला विचारला प्रश्न; भडकलेली अभिनेत्री म्हणाली, ‘बाजूला व्हा रे…’
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता

हे देखील वाचा