प्रसिद्ध पॉप गायिका फाल्गुनी पाठक यांनी 90 च्या दशकात ‘मैंने पायल है छनकाई’ हे गायलेले गाणं आजही कानात गुंजते. मात्र, आता नेहा कक्करने हे गाणं रिक्रिएट करून फाल्गुनी यांच्या चाहत्यांना निराश केलं आहे. लोक या गाण्यातील नेहाच्या आवाजावर खूप टीका करत आहेत आणि 90 च्या दशकातील हे हिट क्लासिक गाणं खराब केल्याबद्दल तिला जोरदार ट्रोल देखील करत आहेत.
नुकतंच नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचे हे गाणे टी-सीरिजच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. गाणं ऐकल्यानंतर युजर्स नेहावर चांगलेच संतापले आहेत. युजर्स नेहावर त्यांच्या बालपणीच्या आवडत्या संगीताच्या आठवणी नष्ट केल्याचा आरोप करत आहेत. एका युजरने या रिक्रिएट गाण्यावर कमेंट करत लिहिले की, “एक दो तीन गाण्यांसारखी गाणे श्रेया घोषालच्या आवाजात बनवलं गेले असते, तर मी गाण्यांच्या रिमेकच्या विरोधात नसताे. मात्र, नेहा कक्करच्या आवाजाने तर माझ्या कानाचे पडदे फाडले.” नेहाच्या आवाजात बालपणीचे आवडते गाणे ऐकून संतापलेल्या ट्रोलर्सने नेहाला 8 वर्षांची शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
Neha Kakkar should be punished – imprisonment for 8 years to ruin our 90's childhood best songs.
— Himanshu Khandelwal (@Himansh28055380) September 20, 2022
नेहाच्या आवाजात गायलेलं ‘मैंने पायल है छनकाई’ या गाण्यावर युजर्स नकारात्मक कमेंटस करत आहे. एका युजर्सने नेहाला क्लासिक गाणं खराब केल्याबद्दल तिला बॅन करायची मागणी केली आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कुणी नेहाच्या गाण्याला कायमच बॅन करा, ती बऱ्याच क्लासिक गाण्यांना आपला आवाज देऊन खराब करत आहे.”
Also please someone ban Neha Kakkar from singing, FOREVER!!!!
Her voice has ruined too many classics…???? https://t.co/z2Ezrq07RS— ..Anusha.. (@_anushax_) September 18, 2022
अलीकडेच नेहाचा मनाली ट्रान्सवर लाईव्ह परफॉर्मन्स केल्याचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. यासाठी तिला खूप ट्राेलही करण्यात आलं हाेतं. कारण बऱ्याच लाेकांना वाटतं की, ती फार वाईट गाणं गाते. या शाेमध्ये तिची तुलना ‘ढिंच्याक पूजा’साेबतही केली जात आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “रात्री माझ्या कानाजवळ जे डास गुंगगुंग करतात त्याला मॅच हाेताे नेहा कक्करचा आवाज.”
नेहा कक्करने रिक्रिएट केलेलं ‘मैंने पायल है छनकाई’ या गाण्याच्या व्हिडिओवर ती स्वत: डान्स करताना दिसली. नेहासाेबतच ‘बिग बाॅस’ फेम प्रियांका आणि धनश्री वर्मा देखील थिरकताना दिसल्या. हे गाणे इंस्टाग्रामवर पाेस्ट करत नेहा कक्करने कॅप्शनमध्ये प्रियांकाला ‘साॅरी’ म्हणत धनश्री आणि आपल्या परफॉर्मन्सला हिट म्हटले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता
‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’ अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा
सोशल मीडियावर व्हायरल होतोय राजूंचा शेवटचा व्हिडिओ, कुटुंबासोबत गाणे गाताना दिसले कॉमेडियन