नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक नवनवीन चांगल्या सुखद बातम्या आपल्या सर्वांच्या कानावर येत आहेत. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर अनेक हिंदी मराठी नवीन चित्रपटांच्या घोषणा झाल्या. आता मराठी सिनेसृष्टीमधून देखील एक आनंदाची बातमी येत आहे. मराठी मालिकाविश्वातील नवखा आणि प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्याने साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका असणाऱ्या ‘तू तेव्हा तशी’ मध्ये काम करणाऱ्या अभिनेता स्वानंद केतकरने नुकताच साखरपुडा केला. स्वानंद केतकरने त्याची मैत्रीण अक्षता आपटेसोबत साखरपुडा केला आहे. मागील अनेक दिवसांपासून स्वानंद आणि अक्षता रिलेशनशिपमध्ये होते. ते नेहमीच त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.
View this post on Instagram
आता त्यांनी साखरपुडा करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. स्वानंद आणि अक्षताने 4 जानेवारीला साखरपुडा केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. आता स्वानंद अक्षताच्या साखरपुड्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून, त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. स्वानंदने साखरपुडा केलेली अक्षता एक कवियित्री आणि अभिनेत्री आहे.
स्वानंद हा पक्का मुंबईकर असून, त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याने शाळेत आणि कॉलेजमध्ये विविध अभिनय स्पर्धांमधून भाग घेतला आणि खूप बक्षिसे देखील मिळवली. स्वानंदने कलाश्रय नावाची संस्था काढली असून त्यातून तो गाण्याचे वारली पेंटिंगचे धडे मुलांना देतो. याशिवाय तो सोशल मीडियावर विविध मजेशीर व्हिडिओ देखील बनवून पोस्ट करत असतो.
View this post on Instagram
स्वानंद केतकर ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत ‘निल’ ही भूमिका साकारत असून त्याच्यासोबत या मालिकेत स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, सुहास जोशी, अभिज्ञा भावे आदी कलाकारांसोबत काम करत आहे. स्वानंदीची ही पहिलीच मालिका असून, त्याने पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली असून, त्याची भूमिका छोटी असूनही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’
ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ