Wednesday, July 3, 2024

एक व्हिडिओ अन् ८ फोटोंमधून झालं मराठमोळ्या गायत्रीच्या सुंदरतेचं दर्शन; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेमाची परिभाषा बदलली. प्रेम करताना वयाची कसलीही मर्यादा येत नाही, असा संदेश या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना दिला. अनोख्या कथेमुळे प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेसोबतच इशा निमकर अर्थातच अभिनेत्री गायत्री दातारनेही चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.

सध्या लॉकडाउनच्या काळात सर्वचजण सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे, गायत्रीही सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. फोटो असो वा व्हिडिओ, ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अलिकडेच तिने आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो पाहून प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडत आहे.

खरं तर अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला काही शॉर्ट व्हिडिओ आणि फोटोज पाहायला मिळतील. यात अभिनेत्रीचे वेगवेगळे फोटो दाखवण्यात आले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत गायत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “१ व्हिडिओ- ८ फोटो, ट्रेंड मजेदार असतात.” गायत्रीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओली भरभरून लाईक्स दिले आहेत. त्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

एका युजरने लिहिले, “अप्रतिम.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “खूप छान दिसतेय गायत्री.” आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, “तू माझा दिवस बनवलास!” याशिवाय या व्हिडिओवर हार्ट आणि फायर ईमोजीचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा