Tuesday, July 9, 2024

तुनिशा शर्मा मृत्यु: पोलिसांनी शिजान खानवर दाखल केले चार्जशीट, आज होणार जामिनावर सुनावणी

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात आता वसईच्या वाळिव पोलिसांनी अभिनेता शिजान मोहम्मद खानच्या विरोधात ५२४ पानांची चार्जशीट वसई कोर्टात सादर केली आहे. यातच शिजान मोहम्मद खानच्या जामिनाच्या याचिकेवर २७ फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी अभिनेत्री तुनिशा शर्मा तिच्या टेलिव्हिजन शोच्या सेटवर मृत पाहिली गेली. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंड असलेल्या शिजान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली. तुनिशाच्या आईने शिजानवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला.

tunish sharma
Photo Courtesy: Instagram/_tunisha.sharma_

आता पोलिसांनी शिजान विरोधात दाखल केलेल्या चार्जशीटवरून लक्षात येते त्याला पोलिसांनी प्राथमिक दृष्ट्या आरोपी मानले असून, त्याच अनुषंगाने त्याच्या विरोधात ५२४ पानांचे चार्जशीट तयार केले गेले आहे. यामुळे शिजान मोहम्मद खानच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. याआधी शिजानची जामीन याचिका सेशन कोर्ट आणि खालच्या कोर्टात फेटाळली गेली आहे. शिजान आणि तुनिशा यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते. या दोघांचे नाते सर्वश्रुत ओटे, मात्र जेव्हा नात्यात तणाव निर्माण व्हायला लागला तेव्हा तुनीषाने आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाजात दिसत आहे.

तत्पूर्वी शिजान मोहम्मद खान याच्या दोघं अभिनेत्री बहिणींनी भावाला वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला. तुनिशा शर्मा आणि शिजान मोहम्मद खान यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकारांनी तिला न्याय मिळावा असे सांगितले. यात अभिनेत्री कंगना रणौतचा देखील सहभाग होता. तुनिषाच्या मृत्यूचे प्रकरण तिने गांभीर्याने घेत यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट देखील शेअर केली होती. यावर अनेकांनी तिला सहमती दाखवली होती. तत्पूर्वी तुनिशा चांगलीच प्रसिद्ध होती. तिने मालिकेसोबतच काही पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा