Thursday, April 18, 2024

‘ते जिवंत आहे पण…’, शीझान खानला वाईट काळात वडिलांनी दिली नाही साथ अभिनेत्याने केला खुलासा

छोट्या पडद्यावरचा अभिनेता शिझान खान हा काही दिवसांपुर्वी एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आला होता ते म्हणजे तुनिषा शर्माची आत्महत्त्या. शिझान खानसाठी सर्वात वाईट काळ तो होता, जेव्हा 2022 मध्ये त्याच्यावर आत्महत्येसाठी प्रेरीत केल्याचा आरोप केला गेला होता. त्याची अली बाबा दास्तान-ए-काबुलमधील को-स्टार तुनिषा शर्मा हिने सुसाइड केला आणि तिच्या आत्महत्तेसाठी त्याला जबाबदार ठरवण्यात आलं होतं.या विषयातून त्याची निर्दोष सुटका तर झाली होती परंतू त्याने त्यावर खुलून काही भाष्य केले नव्हते. काल माध्यमांशी बोलताना त्याने बऱ्याच दिवसांनी त्या विषयी एक खुलासा केला आहे.

वडिलांकडुन नाही मिळाला कसलाच सपोर्ट
तुनिषा शर्मा आत्महत्तेप्रकरणी(Tunisha Sharma Suicide case) शिझान एक महिना जेलमध्ये होता. नुकतेच त्याने आयुष्यातील सर्वात वाईट वेळेबद्दल बोलताना तो म्हणाला, त्याचे वडील, जे जिवंत आणि तंदुरुस्त आहेत, तसं असुनही शिझानच्या वाईट वेळेत त्यांनी एकदाही त्याला काॅल केला नाही.

वडीलांपासुन वेगळं झाल्याचंही बोलला शिझान
इंटरव्यूमध्ये बोलताना, शिझानने(sheezan khan) खुलासा केला की तो 6 ते 8 वर्षांचा असताना त्याचे वडील त्याच्या आईला सोडून गेले. त्यामुळे त्यांच्याशी त्याचं कधीच काही नातं नव्हतं कारण ते कधीच त्याच्यासोबत राहीले नाहीत. त्यानंतर त्याने सांगितले की, कसे लोक त्याला नेहमी विचारातात की जेव्हा लोक कायदेशीर बाबींदरम्यान त्याला आणि कुटुंबाला सपोर्ट करत नाव्हते तेव्हा त्याला कसं वाटायचं.

शिझान म्हणाला की, माझे स्वतःचे वडील माझ्यासाठी आले नाहीत, त्यामुळे मला काही फरक नाही पडला की बाकी जगाला माझी काळजी आहे का नाही. त्याने सांगितलं की, त्याचे वडील त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत राजस्थानमध्ये राहतात. त्याने पुढे खुलासा केला की, त्याची आई त्याला आधारस्तंभासारखी नेहमीच सपोर्ट करते. आणि त्यांनी नेहमीच त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे.

तुनिषा शर्माच्या(tunisha sharma) निधनानंतर हा खुलासा झाला होता की, ती शिझान खान च्या प्रेमात होती. तुनिषाच्या आईने शिझान विरोधात FIR लिहिला होता आणि तिला आत्महत्येसाठी प्रेरीत केल्याचा आरोप केला होता. तुनिषाच्या आईने सांगितलं होतं की, शिझान त्यांच्या नात्यात नेहमी तिला फसवत होता. शिझानचं कुटुंब त्यांचा धर्म पाळण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तुनिषा शर्मा सुसाइड केस विषयी शिझान खानने केला मोठा खुलासा, पहा नक्की काय म्हणाला ते
बिग बॉस फेम अर्चना गौतम रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करून म्हणाली, ‘लोकांची दृष्ट लागली आणि…’

हे देखील वाचा