Wednesday, June 26, 2024

प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह

चित्रपट आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेते आदित्य सिंग राजपूत याचे निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरी येथील त्याच्या घराच्या बाथरूममध्ये गूढ परिस्थितीत अभिनेत्याचा मृतदेह आढळून आला. अभिनेत्याने ‘क्रांतिवीर’ आणि ‘मैंने गांधी को नही मारा’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.

आदित्य सिंग राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, आदित्य सोमवारी (दि. 22 मे)ला दुपारी त्याच्या अंधेरीतील घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. आदित्यच्या एका मित्राला ही गोष्ट पहिल्यांदा कळली. अभिनेत्याचे घर इमारतीच्या 11व्या मजल्यावर आहे जिथे तो मृतावस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर, त्याचा मित्र आणि इमारतीच्या चौकीदाराच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केले.

आदित्यचे कुटुंब दिल्लीत राहत असताना, अभिनेता मुंबईतील अंधेरी लोखंडवाला येथील लष्करिया हाइट्स नावाच्या इमारतीत रूममेटसोबत राहत हाेता.

अशात अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ओशिवरा पोलिसांनी एक पथक रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणात काही संशयास्पद आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.(tv actor aditya singh rajput died dead body found in house bathroom )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

हे देखील वाचा