‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा


दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा एक मल्टीटॅलेंटड अभिनेता होता. अभिनयाव्यतिरिक्त त्याला चंद्र, तारे, अवकाश याबाबत खूप आवड होती. तो अनेकवेळा स्पेस, गॅलेक्सी याबाबत बोलत असायचा. तो २०२४ मध्ये नासातर्फे चंद्रावर जाण्याची तयार करत होता. त्याने नासासोबत एका वर्कशॉपमध्ये ट्रेनिंग देखील घेतले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर आता त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना त्याच्या सगळ्या गोष्टींची आठवण येत आहे. त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने तिच्या भावाबाबत एक खुलासा केला आहे. ती त्याला जगातील एक एकमेव ट्रेंड एस्ट्रोनॉट म्हणत आहे.

सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग कीर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुशांत एस्ट्रोनॉटच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, “आमचा सुशांत आमचा गौरव” या सोबतच फोटोवर लिहिले आहे. “जगातील एकमेव अभिनेता, ज्याने नासाकडून एस्ट्रोनॉटची ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून २०२४ मध्ये तो मून मिशनचा भाग बनू शकेल. आमचा सुशांत, आमचा गौरव.”

ही पोस्ट पाहून सुशांतचे चाहते पुन्हा एकदा भावुक झाले आहेत. त्याच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तो एक हिरा होता, जो नष्ट झाला आहे आणि आजपर्यंत ते सगळे मुक्त आहेत. खूप वाईट वाटत आहे.” तसेच अनेक चाहते सुशांतचे कौतुक करत आहेत. (Sushant Singh Rajput sister Shweta Singh kirti says the only actor who got trained by nasa)

सुशांतला चंद्र, तारे खूप आवडत होते. त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “त्याने चंद्रावर जागा खरेदी केली आहे. नासा २०२४ मध्ये काही एस्ट्रोनॉटला चंद्रावर पाठवणार आहेत. मी देखील या सगळ्याची तयारी करत आहे. नासासोबत एक वर्कशॉप देखील केले आहे. जिथे मला ट्रेनिंग दिली आहे तसेच इंस्ट्रक्टरचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.” त्याला याबाबत एवढी आवड होती की, त्याने ५५ लाख रुपयांचा टेलिस्कोप खरेदी केला होता. तो त्याच्या बाल्कनीमधून आकाशाचे निरीक्षण करत असायचा.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’

-फिल्म इंडस्ट्रीबाबत राजपाल यादवचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आर्थिक तंगी दरम्यान इंडस्ट्रीने मला…’

-बिग बींच्या ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता दुर्दैवी अंत; लहानपणीच केली होती तिच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी


Leave A Reply

Your email address will not be published.