Monday, June 24, 2024

पत्नीसोबत फिरायला निघालेल्या मास्तरांवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट; म्हणाले, ‘त्यांच्या युगात…’

सब टीव्हीचा लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ पुन्हा एकदा नव्या टप्पूच्या एंट्रीने चर्चेत आला आहे. या शोशी निगडीत सर्व पात्र प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. लहान मुले असोत की प्रौढ, शोमधील प्रत्येक पात्र कथेत जिवंतपणा आणतो. या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकरचीही अशीच कथा आहे.

आत्माराम तुकाराम भिडे (atmaram tukaram bhide) यांची व्यक्तिरेखा साकारून रातोरात प्रसिद्धीझोतात आलेला मंदार चांदवडकर (mandar chandwadkar) शोमध्ये मुलांची ट्यूशन घेताे. त्यांचा एक संवाद आहे, जो तो वारंवार म्हणतो, ‘आमच्या काळात असे होते, आमच्या काळात तसे होते.’ सीरियलमध्ये त्याला त्याचा काळ आठवत असेल, पण खऱ्या आयुष्यातही त्याने त्याचा काळ एन्जॉय केला आहे.

मंदार चांदवडकरने इंस्टाग्रामवर काही फाेटाे शेअर केली आहेत, ज्यात तो पत्नी स्नेहिलसोबत गावासारख्या ठिकाणी पोज देताना दिसत आहे. खरे तर, हा फोटो त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त शेअर करण्यात आला आहे. मात्र, एक प्रसिद्ध अभिनेता असूनही, चाहत्यांनी ताे जमिनीवर राहिल्याबद्दल त्याच्या उत्साहीपणाचे कौतुक केले आहे. त्याच्यावर अनेक चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

मंदार चांदवडर यांच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्याला ‘तारक मेहेता का उल्टा चश्मा’ या शाेमधून खरी ओळख मिळाली. या शाेमध्ये मंदार ‘भिडे’ ही भूमिका साकारताे. या भूमिकेने मंदारला अमाप लोकप्रियता मिळाली. मंदार चांदवडकर यांची भूमिका जेठालाल इतकीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मंदार हा अभिनयात येण्याआधी दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करायचा. तिथे देखील ताे एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर हाेता. मात्र, अभिनयासाठी ताे मुंबईत आला आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने त्यांना उत्तम ब्रेक मिळवून दिला.(tv actor atmaram tukaram bhide aka mandar chandwadkar of taarak mehta ka ooltah chashmah shares rare pic with wife snehl )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कशी नशीबाने आज थट्टा मांडली! ‘द कपिल शर्मा शाे’चा स्टार सुनील ग्रोवर चालवताेय रिक्षा

पन्नाशी गाठलेल्या अक्षयचा तिशीतल्या मृणालसोबत रोमान्स, प्रश्नांचा भडीमार करत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा