Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड ‘टीव्ही कलाकारांसोबत होतो भेदभाव, सुशांतने रस्ता मोकळा केला’ म्हणत गुरमीत चौधरीचा बॉलिवूडवर आरोप

‘टीव्ही कलाकारांसोबत होतो भेदभाव, सुशांतने रस्ता मोकळा केला’ म्हणत गुरमीत चौधरीचा बॉलिवूडवर आरोप

टेलिव्हिजन दुनियेपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणं खूप अवघड असतं. प्रत्येक टीव्ही कलाकाराला असं वाटतं की, बॉलिवूडमध्ये काम करून आपल नावं कमवावं. पण बऱ्याच वेळा ते अयशस्वी होतात. टीव्हीवर काम करणाऱ्या कलाकारांना सहजासहजी बॉलिवूडमध्ये काम दिले जात नसल्याचा आरोप अभिनेता गुरमीत चौधरी याने लावला आहे.

तो म्हणतो की, टीव्ही कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम दिले जात नाही. जेव्हा टीव्ही कलाकार काम मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना नको ती कारणं दिली जातात. या सोबतच त्याने सुशांत सिंग राजपूत याच्या नावाचा उल्लेख करत म्हटले आहे की, सुशांतने बॉलिवूडमध्ये प्रवेश करून टीव्ही कलाकारांसाठी एक रस्ता मोकळा केला आहे.

गुरमीत चौधरीने एका मुलाखतीत सांगितले की, “टीव्ही कलाकारांसोबत बॉलिवूडमध्ये नेहमीच भेदभाव होताना दिसतो. जेव्हा आम्ही काम मागायला जातो, तेव्हा आम्हाला कारणं सांगितली जातात की, सगळे प्रेक्षक तर तुम्हाला रोज बघतात, मग आम्ही तुमच्यावर खर्च का करावा?” यानंतर तो म्हणतो की, “टीव्ही कलाकारांना चित्रपटात काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण बॉलिवूडमधील कलाकार त्यांना येऊ देत नाहीत.”

या सोबतच गुरमीतने सुशांत सिंग राजपूत याचा उल्लेख करत म्हटले की, “सुशांतने टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास केला. सुशांतचे हे यश बघून मला असं वाटतंय की, मला देखील आता बॉलिवूडमध्ये प्रवेश केला पाहिजे. मी आता असं ठरवलं आहे की, मला केवळ बॉलिवूडमध्ये चांगले काम नाही, तर सगळ्यांचा मनात एक स्थान निर्माण करायचे आहे.”

नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म जी-5 वर एक स्पाईन थ्रिलर आणि हॉरर चित्रपट ‘द वाईफ’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गुरमीत चौधरी आणि सायना दत्ता मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कहाणी बाकीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे. गुरमीतने सांगितले की, “हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. आम्ही काही तरी वेगळं ट्राय केलं आहे. आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मला असं वाटतंय की, ते करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुशांतच्या मृत्यूचा धक्का आजही पचवू शकली नाही अंकिता, मुलाखतीत सांगितल्या ‘या’ गोष्टी

-आमिर खाननंतर आता आर माधवनही झाला कोरोना पॉझिटिव्ह, अभिनेत्याने मजेशीर अंदाजात  दिली माहिती

-धक्कादायक! रिक्षामध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, दीर्घ काळापासून होता आर्थिक अडचणीत

हे देखील वाचा