Wednesday, July 3, 2024

पहिल्याच मालिकेतून टेलिव्हिजनच्या ‘सम्राट’ झालेल्या मोहितने चित्रपटांपासून केली होती करिअरला सुरुवात

चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन अनेक जणं जगत असतात आणि त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल देखील करतात. मात्र सर्वच त्यांचे ध्येय साध्य करू शकतात असे नाही. काहींना कामच मिळत नाही तर काहींना या क्षेत्रात काम मिळते पण यश मिळत नाही. असच एक अभिनेता म्हणजे मोहित सेहगल. टीव्ही इंडस्ट्रीमधील हार्टथ्रोब म्हणून ओळखला जाणारा मोहित सेहगल आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो, मात्र त्याच्या करिअरची सुरुवात अपयशाने झाली. आज (३ डिसेंबर) मोहित त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

मोहितच्या जन्म ३ डिसेंबर १९८५ साली दिल्ली इथे झाला. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात २००७ साली आलेल्या दिल्ली हाईट्स या सिनेमातून केली. मात्र त्याला या सिनेमात यश मिळाले नाही. मग त्याने त्याचा मोर्चा टीव्हीकड वळवला. २००८ ‘मिले जब हम तुम’ त्याने त्याच्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांवर जादू फिरवली आणि त्याला तुफान यश मिळाले. या मालिकेत त्याने ‘सम्राट’ हे पात्र साकारले होते. मालिकेनंतर त्याला ‘सम्राट’ नावानेच ओळखले जाऊ लागले.

मालिका संपल्यानंतर २०१० साली मोहितने ‘जरा नच के दिखा’ या रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. सोबतच त्याने ‘मीठी छुरी नंबर 1’ या शोचे सूत्रसंचालन देखील केले. पुढे त्याने ‘जोर का झटका: टोटल वाइपआऊट’मध्ये आणि पत्नीसोबत ‘नच बलिए 8’मध्ये सहभाग घेतला. या शोचे ते उपविजेते ठरले. इतकेच नाही तर त्याने ‘बॉक्स क्रिकेट लीग 2’ आणि ‘किचन चॅम्पियन 5’मध्ये देखील सहभाग घेतला.

मोहितने २०१६ साली अभिनेत्री सनाया इराणीसोबत लग्न केले. त्यांची पहिली भेट ‘मिले जब हम तुम’ या मालिकेदरम्यान झाली. या मालिकेत दोघेही एकमेकांच्या अपोझिट होते. कॉलेजमधील सर्वात हँडसम मुलगा ‘सम्राट’ ही भूमिका निभावणार मोहित आणि अतिशय साधी भोळी ‘गुंजन’ ही भूमिका साकारणारी सनाया यांच्यात सुरुवातील मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. जवळपास ७ वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी २०१६ साली गोवा इथे लग्न केले.

मोहितने ‘मिले जब हम तुम’, ‘साथ निभाना साथिया’, ‘परिचय- नए जिंदगी के सपनों का’, ‘मुझसे कुछ कहती..ये खामोशियां,’ ’पवित्र रिश्ता,’ ‘कबूल है,’ ‘डोली अरमानों की’. ‘तुम्हारी पाखी’, ‘सरोजनी-एक पहल’, ‘लव का है इंतजार’, ‘ये है मोहब्तें’, ‘नागिन ५’ आदी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
‘आता नंबर कोणाचा?’, माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटाच्या टीझर प्रेक्षकांच्या भेटीला ; एकदा पाहाच
‘माचीस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जिम्मी शेरगीलने कॅरेक्टर भूमिकांमधून मिळवली तुफान प्रसिद्धी

हे देखील वाचा