विश्वास बसत नाही, पण हे खरे आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नाही. सिद्धार्थचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थवर ओशिवारा येथे अंतिमसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या पार्थिवावर त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार ‘ब्रह्मकुमारी’ पध्दतीने विधी करण्यात आले आहे. सिद्धार्थचे आणि त्याच्या आईचे अनेक वर्षांपासून ‘ब्रह्माकुमारी’ केंद्राशी चांगले संबंध आहेत. तसेच सिद्धार्थ वारंवार ब्रह्माकुमारी केंद्राला भेट देण्यासाठी जात होता.
‘ब्रह्माकुमारी’ विधी म्हणजे काय?
सिद्धार्थचा अखेरचा प्रवास संपला. त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि तो अमर होण्यासाठी त्याच्यावर ‘ब्रह्माकुमारी’ विधी करण्यात आले. माध्यमातील वृत्तानुसार, प्रथम सर्वजण एकत्र बसुन ध्यान केले आणि नंतर सिद्धार्थच्या शरीराला टिळक लावल्यानंतर पुष्पहार घातला. त्यानंतर सर्वांनी जप करत त्याला श्रध्दांजली अर्पण केली. सिध्दार्थला ब्रह्माकुमारी केंद्राची आवड असल्यामुळे नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन सणादिवशी देखील तो ब्रह्माकुमारी केंद्राला गेला होता.
सिध्दार्थला अध्यात्माची प्रचंड आवड होती. सिद्धार्थचा अध्यात्मावर विश्वास होता, याचे कारण म्हणजे तो बऱ्याच दिवसांपासून ब्रह्मकुमारी संस्थानाशी जोडलेला होता. सिद्धार्थची आई रीता शुक्ला यांचे बऱ्याच काळापासून ब्रह्माकुमारी संस्थानाशी संबंध आहेत. त्या राजयोग ध्यानाकरता माउंट अबू याठिकाणीही भेट देण्यासाठी जातात. सिद्धार्थ देखील त्यावेळी त्याच्या आईसोबत ब्रह्माकुमारी केंद्रात नेहमी जात-येत असे. सिद्धार्थला योगाभ्यासामध्ये प्रचंड आवड होती, शिवाय त्याला एकांतात राहायला खूप आवडायचे. त्यामुळे त्याचं अध्यात्माशी जुनं नातं आहे.
दरम्यान, सिद्धार्थ शेवटचा एकता कपूरच्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री सोनिया राठीही दिसली होती. सोनियाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि सिद्धार्थच्या आठवणींत लिहिले की, “सिध्दार्थ मी तुला खूप मिस करत आहे. तू खूप छान व्यक्ती आणि मित्र होतास.” तसेच सोनियाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक चाहते या पोस्टवर प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन
-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल
-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’