Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पहिली मालिका गाजवूनही ‘या’ टिव्ही कलाकारांना काम मिळवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

चित्रपट किंवा मालिकांंमध्ये काम मिळवण्यासाठी कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मनोरंजन जगतात जितका पैसा, प्रसिद्धी या कलाकारांना मिळतो. तितकाच त्यांना संघर्षही करावा लागतो. पण हिंदी टेलिव्हिजनवरील असेही अनेक कलाकार आहेत ज्यांची पहिल्या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली, घराघरात लोकप्रियताही मिळाली पण तरीही त्यांना काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

रोनित रॉय – ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘अदालत’ फेम रोनित रॉय हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठा अभिनेता मानला जातो. मोठे यश मिळवूनही रोनित बराच काळ अभिनयापासून दूर राहिला. रोनित रॉय 2010 मध्ये ‘अदालत’द्वारे परत आला त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातही त्याला काम करण्याची संधी मिळाली.

उर्वशी ढोलकिया – टीव्हीची प्रसिद्ध व्हॅम्प बडी कोमोलिका बनलेली उर्वशी ढोलकिया देखील कामासाठी संघर्ष करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘कोमोलिका’ची भूमिका केल्यानंतर कामावर परतण्याबद्दल बोलताना उर्वशीने “मी कामावर परतले, मला अशी व्यक्तिरेखा मिळाली की माझ्या जवळ कोणीही फिरकले नाही. हे पात्र साकारल्यानंतर मला कोणत्याही कामाची ऑफर आली नाही. प्रत्येकजण माझी त्या पात्राशी तुलना करत राहिला, तरीही मला हरकत नव्हती.” असे सांगितले होते.

श्वेता तिवारी: सोज्वळ लूक आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी श्वेता तिवारी यश मिळवल्यानंतरही नेहमीच कामासाठी संघर्ष करत असते. ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या लोकप्रिय टीव्ही शोनंतरही श्वेता कामापासून दूर होती. श्वेता ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, परंतु दुसऱ्यांदा अयशस्वी लग्नामुळे ती तिच्या करिअरमध्ये तसेच आयुष्यातील अनेक संकटाच्या टप्प्यातून जात होती. मात्र, तिने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले

साक्षी तन्वर: पार्वती आणि प्रिया म्हणून घरोघरी ओळख मिळवून देणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वरलाही तिच्या कारकिर्दीत हार्टब्रेकचा सामना करावा लागला आणि तिला तिच्या कारकिर्दीतील दोन ब्लॉकबस्टर मालिका करुनही तिला कामासाठी झगडावे लागले. ITA अवॉर्ड्स, पीपल्स चॉईस अवॉर्ड्स इंडिया, स्टार गिल्ड अवॉर्ड्स आणि इतर अनेक मधून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले आहेत. आता तिने आपले लक्ष चित्रपट आणि वेब शोकडे वळवले आहे.

सुमोना चक्रवर्ती: सुमोना चक्रवर्तीने तिच्या एका पोस्टमध्ये बेरोजगार असल्याबद्दल पण आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबद्दलचा उल्लेख केला होता. ती म्हणाली, “अखेर खूप दिवसांनी मी घरी पूर्ण व्यायाम केला … कधी कधी मला खूप अपराधी वाटतं. विशेषतःमला काम नसल्यामुळे वाईट वाटतं.” सध्या सुमोना प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा