टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीने आपल्या अभिनयाने प्रत्येक चाहत्याच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त अनिता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी तिने गोंडस बाळाला जन्म दिला होता. यानंतर ती पडद्यापासून दूर राहत आपल्या मुलासोबत उत्तम वेळ घालवत आहे. आपला मुलगा आणि पती रोहित रेड्डीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच शेअर करत असते. नुकतेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या जोरावर जोरदार चापट मारताना दिसत आहे. अनिताचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. दुसरीकडे रोहितनेही बदला घेण्याची घोषणा केली आहे.
अनिताने रोहितसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती त्याच्यासोबत एक प्रँक करताना दिसत आहे. व्हिडिओत ती रोहितला एका खुर्चीवर बसवते आणि त्याला म्हणते की, “माझ्याकडे एक अदृश्य धागा आहे. तो मी तुझ्या एका कानात टाकून दुसऱ्या कानातून बाहेर काढेल.”
व्हिडिओत ती रोहितला विचारते की, “काही जाणवलं का?” यावर रोहित तिला नकार देतो. तेव्हाच अनिता अचानक रोहितला गालावर जोरदार चापट मारते. हा व्हिडिओ शेअर करत अनिताने लिहिले आहे की, “कृपया हे घरी करण्याचा प्रयत्न करू नका. पत्नींसाठी मॅजिक ट्रिक.”
या व्हिडिओवर चाहते आणि अनिताचे मित्र मंडळी जोरदार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दुसरीकडे रोहितही बदला घेण्यासाठी तयार आहे. त्याने अनिताच्या या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “१-०!! बदल्याची वाट पाहा. तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे.”
रोहितच्या या कमेंटवरून अंदाज लावला जात आहे की, दोघांचे आणखी प्रँक व्हिडिओ समोर येतील.
यावर्षी म्हणजेच फेब्रुवारी, २०२१ मध्ये अनिता आणि रोहित पहिल्यांदा आई- बाबा झाले आहेत. दोघांनीही सन २०१३ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ७ वर्षांनंतर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अनिता अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने ‘ये हैं मोहब्बतें’, ‘काव्यांजलि’, ‘नागिन’ यांसह अनेक शोमध्ये काम केले आहे. दुसरीकडे रोहितबद्दल बोलायचं झालं, तर तो एक व्यावसायिक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच