Thursday, April 24, 2025
Home अन्य भारतीला दमच नाही! अनिता- रोहितने आपल्या मुलाचे नाव सांगण्याआधीच कॉमेडियनने केला नावाचा खुलासा

भारतीला दमच नाही! अनिता- रोहितने आपल्या मुलाचे नाव सांगण्याआधीच कॉमेडियनने केला नावाचा खुलासा

‘नागिन’ मालिकेतील आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. तिने ९ फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला होता. अशातच तिच्या मुलाच्या नावाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी यांनी अद्याप आपल्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही. परंतु तिच्या मुलाचं नाव काय आहे? हे मात्र समोर आले आहे. या जोडप्याने आपल्या मुलाचे सुंदर नाव ठेवले आहे.

खरं तर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ तिने अनिता आणि रोहितला पाठवला होता. परंतु या गिफ्टवर एक कार्डही होते. त्यावर अनिता, रोहित आणि आरव असे लिहिले होते. यावर लिहिलेल्या नावावरून असा अंदाज लावला जात आहे की, या जोडप्याच्या मुलाचे नाव आरव असे आहे.

इतकेच नाही, तर आरवच्या नावाचे इंस्टाग्राम अकाउंटही आहे. आरवच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या प्रोफाईल फोटोमध्ये त्याच्या हाताचा फोटो लावलेला आहे. तरीही, या अकाउंटवरून मात्र एकही फोटो शेअर करण्यात आलेला नाही.

अनिता आणि रोहित ९ फेब्रवारीला आई- वडील बनले आहेत. रोहितने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोबतच अनिताने आपल्या मुलाचा आणि रोहितसोबतचा पहिला फोटो शेअर करत लिहिले होते की, “आणि आम्ही तीन झालो. सर्वांकडून मिळालेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.”

अनिताने आपल्या गरोदरपणात चांगलीच मजा लुटली होती. तिने यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनिताने बेबी बंपसोबतचेही अनेक फोटो काढले होते. यावर चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया आणि प्रेम मिळाले.

खरं तर अनिताने सन २०१३ मध्ये उद्योजक रोहित रेड्डीसोबत संसार थाटला होता. अनिताने अनेक चित्रपटांंमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. निर्माता एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतील तिने साकारलेली भूमिका चाहत्यांना खूप भावली. अनिताची चित्रपट कारकीर्द खूप काही खास ठरली नाही, परंतु ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चांगलीच यशस्वी झाली आहे. अनिता ‘ये है मोहब्बतें’, ‘काव्यांजली’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कसम’ यांसारख्या मालिकांचा भाग राहिली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा