Monday, July 8, 2024

चालत्या ट्रेनमध्ये विकी जैनने पकडला अंकिताचा हात; युजर्स म्हणाले, ‘अहो मॅडम! तुमचा फोन…’

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जाेडप्यापैकी एक आहेत. ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे फाेटाे आणि व्हिडिओ पोस्ट शेअर करतात जे त्यांच्या चाहत्यांना त्यांचे वेड लावण्यासाठी पुरेसे आहे. हे कपल सध्या युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. हे दोघेही आपल्या नवीन वर्षाचे स्वागत युराेपमध्ये करतील. या सगळ्या दरम्यान, अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत शाहरुख खान आणि काजोलचा आयकॉनिक ‘डीडीएलजे’ ट्रेन सीन रीक्रिएट करताना दिसली.

व्हिडिओ शेअर करत अंकिता (ankita lokhande) हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आधीपासूनच डीडीएलजेची फॅन” अंकिताचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सनीही या जोडप्याच्या व्हिडिओवर कमेंट करून त्यांची केमिस्ट्री पसंत केली आहे. महेश शेट्टी(Mahesh Shetty), शुभवी चोकसे(Shubhaavi Choksey), आरती सिंग शर्मा (Arti singh sharma) आणि आशिता धवन(Ashita Dhawan) यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिताचा व्हिडिओ लाईक करत महेश शेट्टीने कमेंटमध्ये लिहिले की,”अरे अरे फोन राहला स्टेशनवर”, तर आरतीने कमेंट करत लिहिले की, “स्वित्झर्लंडमध्ये हे केले नाही तर काय केले.”

अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी तिचा प्रियकर विकी जैन याच्यासाेबत लग्न केले. अलीकडेच या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हे जोडपे 15 दिवस युरोपमध्ये आहे. जिथे दोघांनी आपला हनिमून साजरा केला तसेच दोघेही युरोपमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत.

अलीकडेच तिच्या हनिमून प्लॅनबद्दल माहिती देताना अंकिताने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मी माझ्या पतीसोबत जात आहे. मी कुठे जात आहे याची मला पर्वा नाही. मला फक्त बाहेर जायचे आहे. कारण, सहसा आम्हाला वेळ मिळत नाही आणि आमचा हनिमून गेल्या वर्षीपासून बाकी आहे. मी खरंच या क्षणाची वाट पाहत होते. मला असे वाटत होतं की, मी मेंहदी लावेन आणि माझ्या हनिमूनला जाईन, पण मी बहुतेक वेळा हातमोजे घालेन, असा विचार करून मी ही योजना रद्द केली.”

लग्नानंतर विकीने अंकितासाठी मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. ज्याची किंमत 50 कोटी एवढी आहे. एवढंच नाही, तर विकी आणि अंकिताने त्यांचे नवीन घर देखील खरेदी केले आहे. तसेच अंकिताने त्याच्यासाठी प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे. त्याची किंमत 8 कोटी एवढी आहे. अंकिता तिच्या लग्नासाठी खूप उत्सुक होती. तिला तिचे लग्न अगदी थाटामाटात‌ करायचे होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.(tv actre`s`s ankita lokhande and vicky jain recreated shah rukh khan and kajol iconic ddlj train scene)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादक! रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, उर्वशी पोस्ट शेअर करत म्हणाली…

नवीन वर्षाच्या अगाेदर समंथाने शेअर केली नाेट; म्हणाली, ‘जे काही नियंत्रित करू शकतो…’

हे देखील वाचा