×

‘मला फक्त पैसा…’ अंकिता लोखंडेने सांगितले विकी जैनसोबत लग्न करण्याचे धक्कादायक कारण

टेलिव्हिजनवर अर्चना हे पात्र साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. काही कलाकारांच्या वाट्याला निवडक मालिका येतात पण त्या मालिकांमधून त्यांना आयुष्यभरासाठी ओळख मिळते. त्यातील एक नाव अंकिता लोखंडे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली.

अशातच काही अंकिताने (ankita lokhande) तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले आहे. त्यांनी त्यांच्या लग्नात अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. विकी आणि अंकिता २०१८ पासून एकमेकांना ओळखतात. परंतु आता सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की, तिने इंडस्ट्री बाहेर का लग्न केले? यावरील अंकिताने उत्तर ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. (Ankita lokhande revealed the real reason why she got married to Vicky Jain)

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

एका मुलाखतीत अंकिताने सांगितले होते की, “मी लग्न यासाठी केले आहे जेणेकरून मला पार्टी करता येईल. तुम्हाला माहित आहे का आम्ही तीन दिवस पार्टी करत होतो. आम्हाला फक्त पैसा खर्च करायचा आहे.” तसेच तिने हे देखील सांगितले की, लग्नानंतर तीन रात्र त्यांनी पार्टी केली होती.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

लग्नानंतर विकीने अंकितासाठी मालदीवमध्ये एक विला गिफ्ट केला आहे. ज्याची किंमत ५० कोटी एवढी आहे. एवढंच नाही तर विकी आणि अंकिताने त्यांचे नवीन घर देखील खरेदी केले आहे. तसेच अंकिताने त्याच्यासाठी प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे. त्याची किंमत ८ कोटी एवढी आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

अंकिता तिच्या लग्नासाठी खूप उत्सुक होती. तिला तिचे लग्न अगदी थाटामाटात‌ करायचे होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा :

 

Latest Post