प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता‘ या लोकप्रिय शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अंकिता लोखंडेला या मालिकेतून खूप यश मिळाले होते. ‘पवित्र रिश्ता’ची अर्चना म्हणून ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध झाली. अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘झलक दिखला जा 4’सह अनेक शाेमध्ये काम केले आहे. ‘पवित्र रिश्ता’मध्ये मुख्य भूमिका साकारून वर्षानुवर्षे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले.
अंकिता लोखंडे हिने कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ही अभिनेत्री ‘बागी 3’ चित्रपटात दिसली. मात्र, दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री सहाय्यक भूमिकेत दिसली. अशात आता ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. आपल्या लेटेस्ट मुलाखतीत तिने इंडस्ट्रीत काम न मिळाल्याची व्यथाही मांडली.
अशात अलीकडेच ही अभिनेत्री ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसली होती. टीव्ही क्वीन अंकिता लोखंडे, दिव्यांका त्रिपाठी, अनिता हसनंदानी आणि उर्वशी ढोलकिया ‘द कपिल शर्मा’ शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एकत्र सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान कॉमेडी किंग कपिल शर्माने टीव्ही सीरियलच्या शूटिंगबद्दल बोलताना सांगितले की, टीव्ही अभिनेत्रींना तासनतास शूटिंग करावे लागते. चित्रपटांपेक्षा मालिकांसाठी जास्त काम करावे लागते. याबद्दलचे तुमचे काही अनुभव सांगा…
या शोमध्ये सहभागी होताना अंकिता लोखंडेने तिच्या पहिल्या सीरियल ‘पवित्र रिश्ता’शी संबंधित अनेक खास क्षण शेअर केले. अभिनेत्रीने सांगितले की, ‘एकदा तिला मालिकेत लग्नाचा सीन शूट करण्यासाठी 148 तास शूट करावे लागले होते.’ अभिनेत्री म्हणाली, “मला मालिकेतील लग्नाच्या दृश्यासाठी नऊवारी साडी घालावी लागली आणि मी सलग 148 तास शूटिंग करत होते. त्या दिवसांत आम्ही सेटवरच झोपायचो, पण मला ते दिवस चांगलेच आठवतात.
View this post on Instagram
अंकिता पुढे म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता आणि पवित्र रिश्तामधून मी खूप काही शिकले आहे. त्यावेळी गणपतीचा सण सुरू होता आणि मी नुकतीच मालिकेत काम करायला सुरुवात केली होती. मला दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात जायचे होते आणि त्यावेळी खूप गर्दी होती, पण लोकांनी मला सांगितले की, ते मला दर्शनासाठी मदत करतील, पण त्यांना फक्त एक फोटो हवा आहे. त्यावेळी मला वाटले की,मी प्रसिद्ध झाली आहे.” असे अंकिताने जुन्या आठवणी शेअर करताना सांगितले.(tv actress ankita lokhande shared some special moments from her debut serial pavitra rishta on the kapil sharma show said worked 148 hours continuously)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चित्रपटाचे भविष्य तुम्ही ठरवू शकत नाही…’, म्हणत सीबीएफसी सदस्याने ममता बॅनर्जीच्या विरुद्धात मांडले मत
खलनायकी भूमिकांमधून छाप पडणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला लग्नाच्या ३० वर्षांनंतरही नाही मुलंबाळं, तरीही आनंदात जगते आयुष्य