सध्या भारती सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यातही खूप व्यस्त आहे. अशातच आता भारतीचा पती हर्ष लुंबाचियाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारती तिच्या मुलाने आई म्हणावं यासाठी सर्व प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु तिचा मुलगा तिचे ऐक ऐकत नाही आणि फक्त ‘पापा’ बोलत आहे. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना हसू येत आहे. यासोबतच या व्हिडिओवर चाहत्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत.
हर्ष लुंबाचिया (Haarsh Limbachiyaa) याने बुधवारी (दि. 8 फेब्रुवारी)ला भारती सिंग (bharti singh) आणि मुलगा लक्ष्य (गोला) यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये लक्ष्य पांढऱ्या टी-शर्टमध्ये आजीच्या मांडीवर बसलेला दिसत आहे, तर त्यांच्या शेजारी भारती सिंग बसली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला भारती म्हणते, ‘डोळ्याला दोन ठिकाणी डासांनी चावा घेतला आहे…..’ यादरम्यान, लक्ष्य पापा म्हणतो. त्यानंतर भारती मुलाला ‘मम्मा’ बोलावण्याचा प्रयत्न करते. भारती म्हणते, ‘मम्मा… फिल्टर मे ताे मम्मा बोल दे बेटा’. तरीही लक्ष्य वारंवार ‘पापा…पापा’ म्हणतो. यानंतर भारती आणि तिच्यासोबत बसलेले लोक हसायला लागतात, ज्यानंतर भारती नाराज हाेते.
View this post on Instagram
हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘जी सगळ्याचा बॅंड वाजवते तिचा बॅंड वाजवणाराही काेणी आहे…वाह.’ तर एका चाहत्याने लिहिले, ‘गोलाचे पापाही आम्हाला खूप आवडतात.’ त्याचवेळी एका युजरने लिहिले की, ‘पापा म्हंटल्याने काय झाले, त्याचा चेहरा तर तुमच्यावरच गेला आहे.’
हर्ष लुंबाचिया याचा साेशल मीडियाावर खूप माेठा चाहता वर्ग आहे. काॅमिडियन विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांच्या संमर्कात असताे.( tv actress bharti singh wept bitterly when son gola did not speak mother watch viral video)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक भाऊरावच्या नजरेने कैद केले दोन नवे चेहरे, ‘टीडीएम’मध्ये दिसणार त्यांच्या अभिनयाची कमाल
सिद्धार्थ, कियारा यांना शुभेच्छा देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा कंगनाने साधला निशाणा