Tuesday, May 28, 2024

ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांचं भारती सिंगबद्दल माेठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘माझ्यावर विश्वास ठेवा’

सण 1968 मधील ‘शिकार‘ चित्रपटातील ‘परदे मे रहने दो’, 1972 मधील ‘हरे रामा हरे कृष्णा‘ या चित्रपटातील ‘दम मारो दम‘, ‘कारवां‘मधील ‘पिया तू अब तो आजा‘ आणि इतर अनेक गाणे गाणारी आशा नुकत्याच ‘सा रे ग म प लिटिल‘ या  रिऍलिटी शाेमध्ये आल्या हाेत्या. यावेळी त्यांनी स्वत:ला ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंग हिची मोठी फॅन म्हणून सांगितले आणि सिंगिंग रिऍलिटी शोच्या मंचावर तिच्या प्रतिभेचे आणि कामाचे कौतुक केले आहे.

ज्येष्ट गायिका आशा भाेसले काॅमेडियन भारती सिंगच्या आहेत माेठ्या फॅन
ज्येष्ट गायिका आशा भाेसले (Asha Bhosle) म्हणाल्या, “मी तुझी सर्वात मोठी फॅन आहे आणि जेव्हा मी हे सांगत आहे तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा कारण, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. मी सुरुवातीपासूनच तुझे काम आणि तुझी प्रतिभा पाहिली आहे, तू ज्या प्रकारे टिकून आहे आणि पुढे जात आहे ते कौतुकास्पद आहे. मी तुला कोणत्याही शोमध्ये पाहिले की, तुझ्या विनोदांवर हसते. तू खूप छान व्यक्ती आहे.”

कार्यक्रमादरम्यान आशा यांनी शेअर केल्या आठवनी
गायिका आशा भोसले शोमध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसल्या हाेत्या. स्पर्धकांनी त्यांची हिट गाणी सादर केली. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील काही आठवणी शेअर केल्या. सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अनु मलिक (Anu Malik) आणि नीती मोहन (Neeti Mohan) हे परीक्षक आहेत तर, भारती सिंग (Comedian Bharti Singh) शाेचे होस्ट करत आहे. ‘सा रे ग म प लिटिल’ (Sa Re Ga Ma Pa) झी टीव्हीवर प्रसारित होत आहे. (singer asha bhosle says she is a big fan of comedian bharti singh)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
लेक आयराच्या साखरुपुड्यात बेधुंद थिरकला आमिर खान, पहा व्हायरल व्हिडिओ

‘माझ्या आज्जी-आजोबांनी खूप चांगले वळण लावले..’,म्हणत प्रतिक बब्बरने व्यक्त केला अभिमान

हे देखील वाचा