टेलिव्हिजन विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री चंद्रिका साहाने तिचा नवरा असलेल्या अमन मिश्रा विरोधात १५ महिन्याच्या मुलाला बेडरूममधील फरशीवर आपटून जखमी केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. बांगूर नगर पोलीस ठाण्यात तिने ही तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर त्या छोट्या बाळाला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
चंद्रिकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिची २०२० साली शेयर ट्रेडर असलेल्या अमन मिश्राशी भेट झाली. त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि मागच्या वर्षी त्यांना एक मुलगा झाला. चंद्रिकाने पोलिसांना सांगितले की, अमन त्यांच्या मुलाच्या जन्मामुळे अजिबात आनंदी नव्हता. ५ मे ला तिने बेडरूममध्ये मुलाच्या अंगावर काही जखमा आणि त्याला रडताना पाहिले. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने जेव्हा घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा त्यात जे दिसले ते पाहून तिला मोठा धक्का बसला. अमन मिश्राने त्याच्या मुलाला तीन वेळा जमिनीवर आपटले.

या तक्रारींबद्दल सिनियर इन्स्पेक्टर प्रमोद तावडे यांनी सांगितले की, “तव अभिनेत्री असलेल्या चंद्रिका साहा हिने दाखल केलेल्या तक्रारीवरून आम्ही अमन मिश्राच्या विरोधात जुवेनाईल जस्टीस लहान मुलांची देखभाल आणि संरक्षण कायदा असलेल्या अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत मुलावर हमला करण्याची तक्रार दाखल केली आहे. याचा तपास चालू असून त्याला अजून अटक केलेली नाही.”
दरम्यान चंद्रिकाने यावर बोलण्यास नकार दिला आहे. तिने आतापर्यंत ‘सावधान इंडिया’, ‘अदालत’, ‘सपने सुहाने लड़कपन के’, ‘क्राइम अलर्ट’, ‘सी.आय.डी.’ आदी अनेक शोमध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट
राखी सावंत पुन्हा संकटात, ड्रामा क्वीनला पुन्हा माराव्या लागणार कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा










